डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्या मागणीची पालकमंत्र्यांनी घेतली दखल
बीड/प्रतिनिधी
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी दलीतवस्ती, दलितेतर, वैशिष्ट्यपूर्ण
योजना, विशेष अनुदान – ठोक तरतुद या योजनांचा निधी नगर पालिकेकडे वर्ग करण्यात यावा अशी मागणी बीडचे माजी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे केली होती त्यानुसार पालकमंत्र्यांनी हा निधी पुन्हा नगर परिषद कडे वर्ग केला असून आता शहरातील प्रस्तावित कामे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.बीड नगर परिषद, बीड साठी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी दलीतवस्ती, दलितेतर, वैशिष्ट्यपुर्ण योजना, विशेष अनुदान ठोक तरतुद या योजनेचा सन २०२१-२०२२ सालचा निधी मंजूर केलेला आहे. नगर परिषद, बीड ही कार्यान्वयन यंत्रणा सक्षम असतांना
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केलेला आहे. सदर निधी वर्ग करणे हे उचित नसुन बीड शहरातील संबंधित लाभार्थी हे प्रशासनावर नाराज झाले,अशी कार्यवाही ही बीड नगर परिषदे विषयी जाणिवपूर्वक हेतु पुरस्पर केलेली होती,सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केलेला निधी त्वरीत बीड नगर परिषद बीड कडे वर्ग करणे विषयी संबंधितांना त्वरीत आदेशीत करावे अशी मागणी डॉ भारतभुषण क्षीरसागर यांनी केली होती त्यानुसार पालकमंत्री अतुल सावे यांनी बांधकाम विभागाकडे वर्ग केलेली कार्यान्वयीन यंत्रणा पुन्हा नगर पालिकेकडे देण्याचा आदेश दिला आहे चालू वर्षीचा 14 कोटी रुपयांचा निधी बीड नगरपालिकेकडे पुन्हा वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे आता प्रस्तावित करण्यात आलेली आणि अडवलेली कामे पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे,बीडच्या स्थानिक आमदारांनी माजी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून नगर पालिकेचा आलेला निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला होता