पिंपरखेड येथे रात्री घडली घटना;डीवायएसपी कडून पाहणी आणि चौकशी
आरोपीची पोलीसा समोर शरणागती;घटने नंतर तर्क- विर्तकांना वेग;दुपार नंतरच कारण होणार स्पष्ट
वडवणी प्रतिनिधी:- सख्या चुलत चुलत्याने मनात राग धरुन धकधार कोयत्याने पुतण्याच्या अंगावर वार करुन खून केला आहे.हि घटना रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास मौजे पिंपरखेड येथे घडली असून मध्यरात्री माजलगांवचे डिवायएसपी धिरजकुमार यांनी घटनास्थळी पाहणी करत चौकशी केली यानंतर आज सकाळी आरोपी असणाऱ्या चुलता पोलीसांच्या ताब्यात असून या घटने विषयी तर्क विर्तक लावले जात असले तरी दुपार नंतर काय कारण ? हे स्पष्ट होणार आहे.
सुत्रांकडून मिळालेली आधिक माहिती अशी कि, वडवणी तालुक्यातील मौजे पिंपरखेड येथील सुरज श्रीकृष्ण शिंदे वय अंदाजे १६ वर्ष हा रात्री साडे सातच्या सुमारास जि.प.शाळेच्या पुढच्या गल्लीत नदीजवळ उभा होता.यावेळी गांवातील विज गेलेली होती याचाच फायदा घेत गणेश अर्जुन शिंदे वय अंदाजे २० वर्ष यांने सुरज शिंदेच्या पाठीमागून जात पाठीवर धकधार कोयत्याचे दोन वार केले यावेळी सुरज शिंदे हा धराधर्ती पडल्यानंतर डोक्यात देखील जबरदस्त वार करत ऐन गालावर एक वार करुन गणेश शिंदे याने घटनस्थळावरुन पळ काढला तेव्हा सदरील माहिती ग्रामस्थांना कळाल्यानंतर घटनास्थळाकडे धाव घेत सुरज शिंदे याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले तेव्हा रुग्णालयात पोहच होताच सुरज शिंदे या मुलाची प्राणज्योत मालवली आहे.हि घटना काही क्षणातच तालुकाभरात वाऱ्यासारखी पसरली का आणि कोणी तसेच कसासाठी मारले असेन असे तर्कविर्तक लावले जात आहेत. मध्यरात्री माजलगांवचे पोलीस उपअधिक्षक धिरजकुमार यांनी घटनास्थळी भेट देत चौकशी केली आहे.यानंतर आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आरोपी देवडी शिवारात असल्याच माहिती मिळाल्या नंतर ताब्यात घेतले असुन घटनेची आपबिती सांगत शरणागती पत्कारली असून आरोपी वडवणी पोलीसाच्या ताब्यात आहे.तर या घटनेतील मयत आणि आरोपी हे सख्खे चुलत चुलते व पुतण्याच अस नात असल्याच ग्रामस्थांकडून सांगण्यात आल आहे. मयताचे वडिल हे परराज्यात ऊसतोडणी साठी गेले होते आज दुपारी १२ वा.बीड जिल्हा रुग्णालयात दाखल झाले असून श्वविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरु आहे.अस सांगण्यात आल आहे.
गुन्हा कबुल, तपास हि सुरु – आनंद कांगुणे
सदरील घटनेतील आरोपी हा गणेश अर्जन शिंदे हा आहे.त्याचे वय जवळपास २० वर्ष असून त्याने दारु पिऊन सुरज शिंदे यांच्याशी बोलत बोलत भांडण झाले होते यांचा राग आला आणि सदरील प्रकार केला आहे.असं म्हणत घडलेल्या प्रकाराची आपबिती सांगितली आहे.आरोपीला देवडी शिवारातून ताब्यात घेतले आहे.परंतु अजून रितसर गुन्हा दाखल झालेला नाही आरोपीनी कबुली दिली असली तरी पोलीसांचा तपास सुरु आहे.अशी प्रतिक्रिया एपीआय आनंद कांगुणे यांनी दै.प्रारंभला दिली आहे.