जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांची माहिती
बीड : जिल्हा रुग्णालयासह आता अधिनस्थ ग्रामीण,
उपजिल्हा रुग्णालयांत देखील अंतररुग्ण, बाह्यरुग्णसंख्या वाढत
आहे. तसेच शस्त्रक्रीयांचा टक्काही वाढला असल्याचे जिल्हा
शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांनी सांगीतले. राष्ट्रीय बाल
स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ३४ शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना
शुक्रवारी (दि. १८) धानोरा (ता. अंबाजोगाई) येथील ग्रामीण
रुग्णालयात शस्त्रक्रीया करण्यात आल्याचेही डॉ. सुरेश साबळे
म्हणाले.
राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत शालेय आरोग्य तपासणीत
परिसरातील शाळा व अंगणवाड्यांत मुलांची तपासणी करण्यात
आली. यात ३४ बालकांची जिभ चिटकल्याचे आढळले. त्यामुळे
त्यांचे बोलणे आडखळत, तोतरे व बोबडे येत होते. त्यामुळे या
मुलांच्या प्राथमिक तपासण्या करुन शुक्रवारी त्यांच्यावर धानोरा
येथील ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रीया करण्यात आल्याचे डॉ. सुरेश
साबळे म्हणाले. लोखंडी सावरगाव (ता. अंबाजोगाई) येथील
वृद्धत्व उपचार व मानसिक आजार केंद्राचे वैद्यकीय अधीक्षक व
शल्यविशारद डॉ. चंद्रकांत चव्हाण यांनी या शस्त्रक्रीया केल्या.
वैद्यकीय अधीक्षक
डॉ. मोरताळे व त्यांच्या चमुने शस्त्रक्रीयेसाठीचे सर्व नियोजन केले.
दरम्यान, राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत शालेय आरोग्य
तपासणीमध्ये मुलांमध्ये आढळलेल्या ऱ्हदयरोगासह इतर सर्वच
गंभीर आजारांवर मोफत शस्त्रक्रीया केल्या जातात, अशी
माहितीही जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांनी दिली.
—
ग्रामीणमध्येही शस्त्रक्रीयांचा विश्वास
—-
दरम्यान, ग्रामीण भागातील रुग्ण चांगले उपचार किंवा शस्त्रक्रीयांसाठी शहरात येतात. त्यामुळे जाणिवपूर्वक ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रीया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णालयांत देखील शस्त्रक्रीया व नियमित उपचार होतात हे ग्रामीण भागातील लोकांना दिसून येईल. यामुळे आता अशाच ठिकाणी उपचार व शस्त्रक्रीया करण्याचा ओढा वाढेल असा विश्वासही डॉ. सुरेश साबळे यांनी व्यक्त केला.