गोळेगाव येथील १ कोटी २० लक्ष रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ
गेवराई प्रतिनिधी : ग्रामीण भागात अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली आहेत, दर्जेदार कामांमुळेच आजवर सर्वाधिक ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला. कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा ग्रामपंचायत निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी तयारीला लागावे असे आवाहन विजयसिंह पंडित यांनी केले. त्यांच्या हस्ते मौजे गोळेगाव व गोळेगाव तांडा येथील रु.1 कोटी 20 लक्ष रुपये किंमतीच्या विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांसह मान्यवर उपस्थित होते.
गोळेगाव ग्रामपंचायत अंतर्गत जि.प.शाळा ते जातेगाव, पांदन रस्ता, ग्रामपंचायत भवन बांधकाम, तलवाडा रस्ता ते तांडा जोडरस्ता, जि.प.शाळा संरक्षण भिंत बांधकाम, गोळेगाव ते कानिफनाथ गड मार्गे गोळेगाव तांडा रस्ता खडीकरण, गोळेगाव तांडा येथे शाळा खोली बांधकाम आणि नाली बांधकाम करणे अशा एकुण 1 कोटी 20 लक्ष रुपये किंमतीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ विजयसिंह पंडित यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी विजयदादा खरात, बाजार समितीचे उपसभापती शामराव मुळे, रामराजे खरात, माजी जि.प.सदस्य साहेबराव पांढरे, सरपंच सिध्देश्वर काळे, जगन्नाथ काळे, बाळासाहेब भिंगले, अरुण तौर, उपसरपंच भाऊसाहेब चव्हाण, शंकरराव पवार, उदयसिंह मस्के यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मौजे गोळेगाव येथील ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या कामाचा विजयसिंह पंडित यांनी आढावा घेवून सरपंच सिध्देश्वर काळे यांच्या कामांबाबत समाधान व्यक्त केले. ग्रामस्थांनी मागणी केलेल्या विविध कामांसाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. घनसांगवी तालुक्यातील राष्ट्रवादीचे युवा नेते विजयदादा खरात यांनी यावेळी भाषण करताना विजयसिंह पंडित यांच्या कामाचे कौतुक करून ग्रामीण भागातील विकासासाठी त्यांना विधानसभेसाठी संधी देण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला बाबासाहेब चव्हाण, दिगांबर खरात, बाबा रडे, रामेश्वर पवार, भरत बादाडे, बळीराम घाटुळ, भगवान काकडे, रुद्रा घोलप, दत्ता वाघमारे, सुनिल मिसाळ, बाळासाहेब गवते, नितीन चव्हाण, सरपंच मोहन कुटे, शरद कबले, ग्रामपंचायत सदस्य सुदाम चव्हाण, रोहिदास चव्हाण, केशव काळे, कृष्णा काळे, शिवाजी वावधने, भिमा खरात यांच्यासह सुभाष काळे, गणेश ढेरे, भाऊसाहेब काळे, सुदाम काळे, सतिष काळे, अरुण काळे, राजेंद्र काळे, विलास वावधने तुकाराम ढेरे, विठ्ठल काळे, महादेव काळे, सर्जेराव काळे, विक्रम काळे, त्रिंबक घाटुळ, राजेंद्र मोरे, संदिपान काळे, दिगांबर ढेरे, परमेश्वर काळे, गोरख खरात, गणेश डोरले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.