बीड प्रतिनिधी : आज दिवसभरात जिल्हा रुग्णालयात मॅरेथॉन बैठका घेण्यात आल्या यामध्ये प्रामुख्याने सुरक्षा गार्ड, नर्शीग महाविद्यालय सर्व स्टाफ, वैद्यकीय सर्व अधिकारी, प्रशासकीय सर्व अधिकारी व कर्मचारी, सर्व सफाई कामगार वर्ग, सर्व नर्सिंग स्टाफ व इन्चार्ज. सर्व वाहन चालक वर्ग. अशा सर्वच विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत मॅरेथॉन बैठका घेण्यात आल्या व त्यांना आयुक्त तुकाराम मुंडे यांना अभिप्रेत आरोग्य सेवा द्या अशा सूचना यावेळी महत्त्वाच्या सूचनाही केल्या.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी पदभार घेतल्यापासून अनेक जन त्यांच्यावर विश्वास ठेवून रुग्ण हे जिल्हा रुग्णालयात येत आहेत. सर्वच वार्डात रुग्ण संख्या वाढलेली आहे. स्वच्छता, शस्त्रक्रिया विभागात छोट्या मोठ्या बारीक गोष्टीकडे सातत्याने लक्ष ठेवून त्याच पाठपुरावा करून रुग्णांना न्याय देण्याचं कार्य सुरू आहे . आयुक्त तुकाराम मुंडे यांनी गेल्या आठवड्यात जिल्हा रुग्णालयात येऊन पाहणी केली असता अनेक गोष्टी त्यांनी सुचवल्या त्या अनुषंगाने जिल्हा रुग्णातील स्वच्छतेसह वैद्यकीय अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्या समवेत आज मॅरेथॉन बैठकीचे आयोजित केले होते. प्रामुख्याने सुरक्षा गार्ड. साफसफाई कर्मचारी वर्ग. सर्व नर्स इन्चार्ज . प्रशासकीय कार्यालयीन कर्मचारी सर्व वाहनधारक यांची आज विभाग निहाय बैठक घेऊन महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. जिल्हा रुग्णल्यातील प्रत्येक विभागात प्रत्येक कर्मचाऱ्यांनी लक्ष देऊन सर्वांनीच सहकार्य केलं पाहिजे. जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला रुग्णसेवा कशी चागंली देता येईल. यासाठी या मॅरेथॉन बैठकीचे विशेष आयोजन केलं होतं
जिल्हा रुग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णसंख्या वाढत आहे. लेबर रूमला 30 ते 40 नव्याने रुग्ण येतात. त्यामध्ये मोठ्या संख्येने शस्त्रक्रियाही कराव्या लागतात. आयसीयू. एन आय सी यु. डायलेसिस विभाग, अपघात विभाग. आयपीडी आणि ओपीडी विभाग यामध्ये जवळपास साडेचारशे ते पाचशे रुग्ण जिल्हा रुग्णात सातत्याने दाखल होतात.
कर्मचाऱ्यांची संख्या कमी पाहता या सर्व रुग्णांना नातेवाईकांना समान न्याय देण्यासाठी तारेवरची कसरत कर्मचाऱ्यांना नेहमीच करावी लागते.
त्या अनुषंगाने आज जिल्हा रुग्णालयात डॉ सुरेश साबळे यांनी प्रत्येक विभागाच्या मॅरेथॉन बैठका घेण्यात आल्या यावेळी त्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यांना आपली जबाबदारी. वेळेवर येणे. आपापल्या कामाचं स्वरूप. रुग्ण सेवा देताना व्यवस्थित बोलीभाषा वापरावी. सर्व कर्मचाऱ्यांनी आपल आपल कर्तव्य पार पाडावे. तंबाखूजन्य पदार्थ कर्मचाऱ्यांनी खाऊ नये किंवा खाऊ देऊ नये. स्वच्छते विषयी सर्वांनीच काळजी घ्यावी. रुग्ण सेवा करतानाही त्यांची हेळसांड होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी. या बैठकीला प्रामुख्याने डॉ सुरेश साबळे, आरएमओ डॉ. संतोष शहाणे,आरएमओ,डॉ. राम आव्हाड, प्राचार्य डॉ.सुवर्णा बेद्रे, प्रमुख मुख्य आधीसेविका रमा गिरी. संगीता महानोर यांच्यासह सर्व विभागप्रमुख कर्मचारी वर्ग उपस्थित होता.