_गुन्हे नोंद असलेल्या दलालांवर आरटीओ कार्यालयात बंदी घाला
_चालु वर्षात दलालांवर ८ फसवणूकीचे गुन्हे बीड ग्रामिण पोलीस ठाण्यात नोंद
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात चालु वर्षात येथील दलालांवर एकूण ८ गुन्हे नोंदविलेले असून यातील आरोपींनी अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करणे, खोटी कागदपत्रे बनविणे, मोटार वाहन टॅक्स च्या खोट्या पावत्या बनविणे, विना उमेदवार लायसन्स बनवून घेणे, शासकीय वाहनांवर हल्ला चढविणे, परराज्यातील चोरीची वाहने बीड जिल्ह्यात खोट्या पद्धतीने नोंदविणे अशे अत्यंत गंभीर गुन्हे नोंद आहेत. तरीही हे दलाल आरटीओ कार्यालय परिसरात खुलेआम फिरत आहेत. हे भ्रष्ट अधिकारी नेमके कोणत्या अधिकार्यांच्या आशीर्वादाने आरटीओ परिसरात खुलेआम फिरत आहैत. हे दलाल आरटीओ कार्यालयातील अधिकार्यांना काही देतात का? त्यामुळे हे अधिकारी या दलालांना घाबरतात का? यासह इतर प्रश्न याठिकाणी उपस्थीत होत आहैत. तरी येथील अधिकार्यांनी या भ्रष्ट दलालांना आरटीओ कार्यालयात बंदी आणावी म्हणजे वाहनधारकांची होणारी लुट फसवणूक होणार थांबेल.
येथील उप परिवहन कार्यालयात गेल्या काही वर्षापासून प्रचंड गैरकामे होत आहेत. यात नुकतेच वरिष्ठ लिपीक सुरेखा डेडवाल यांचे निलंबन करण्यात आलै आहे. याचे सर्वञ समाधान असले तरीही, दुसरीकडे फसवणूकीचे गुन्हे नोंद असलेले भ्रष्ट दलाल माञ आज सुद्धा वाहनधारकांची फसवणूक व लुट करताना दिसत आहेत. संबंधित दलालांवर कारवाई उप प्रादेशिक परिवहन कार्यालय बीड यांचेकडून का होत नाही? या दलालांना अभय आहे तरी कोणाचे? आरटीओ कार्यालय नेमके कोणत्या दबावात काम करते? यासह इतर प्रश्न उपस्थित होत आहेत. भविष्यात परत वाहनधारकांची फसवणूक होणार नाही याची दक्षता संबंधित अधिकार्यांनी घ्यायची गरज आहे. कोणाच्याही दबावाला बळी न पडता येथील अधिकार्यांनी या दलालांवर कारवाई करण्याची गरज आहे.
जिल्हाधिकारी साहेब वाहनधारकांची लुट थांबवा
बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी केंद्रेकर यांनी आरटिओ कार्यालय दलाल मुक्त केले होते, यामुळे येथील वाहनधारकांची लुट थांबली होती. परंतु सध्या मोठ्या प्रमाणात वाहनधारकांची लुट सुरु असून आता जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आरटीओ कार्यालयाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तरी जिल्हाधिकारी साहेब आपण आरटीओ कार्यालयातील गैरकामाबाबत विशेष पुढाकार घेण्याची गरज आहे.