प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जिल्हा नियोजन समितीची बैठक आज (ता. 31) पालकमंत्री यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व आमदारांची उपस्थिती होती. परंतू या बैठकीला परळी मतदार संघाचे आमदार तथा माजीमंत्री धनंजय मुंडे यांनी मात्र दांडी मारल्याचे दिसले. प्रत्येक आमदारांनी आप-आपल्या मतदार संघातील अडीअडचणी बैठकीत मांडल्या. परंतू परळी मतदार संघातील आमदार धनंजय मुंडे यांनी बैठकीस गैरहजरी लावल्यामुळे मात्र परळी मतदार संघातील प्रलंबित प्रश्न समजू शकले नाहीत.
पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्ह्यातील सर्वच आमदार उपस्थित होते. परंतू माजी मंत्री धनंजय मुंडे यांची गैरहजरी या बैठकीला होती. या बैठकीत जवळपास सर्वच आमदारांनी आप-आपल्या मतदार संघातील प्रलंबित प्रश्नांवर बैठकीत चर्चा केली व प्रलंबित प्रश्न लवकर मार्गी लावण्याची मागणी केली. परळी मतदार संघात प्रलंबित प्रश्न आहेत की नाहीत हे मात्र समजले नाही. आमदार धनंजय मुंडे यांच्या गैरहजरीमुळे मात्र चर्चा जोर धरत आहे. कोणत्या कारणामुळे धनंजय मुंडे यांनी आजच्या बैठकीला दांडी मारली हे मात्र समजू शकले नाही.