डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंग्रामच्यावतीने पालकमंत्र्यांना निवेदन
बीड जिल्ह्याच्या विविध विकास कामांना गती व चालना देण्यासंदर्भात शिवसंग्रामच्यावतीने पालकमंत्र्यांना साकडे
बीड : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बीड शहरासह जिल्ह्याचे विविध प्रश्ने व विकास कामे मार्गी लावण्यासाठी डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांकडून पालकमंत्री अतुल सावे यांना निवेदन देण्यात आले. बीड जिल्ह्यातील विविध विषयासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अतुल सावे यांची शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायण दादा काशीद,जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे सुहास पाटील,बीड शहराध्यक्ष अँड.राहुल मस्के,शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे,शिवसंग्राम नेते सचिन कोटुळे, युवा नेते मनोज जाधव, ज्ञानेश पानसंबळ,नामदेव धांडे,शेख लालाभाई,श्रीराम घोलप,पांडुरंग बहिर, विजय डोके व अन्य शिवसंग्राम पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
पालकमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये श्रीक्षेत्र नारायणगड विकासासाठी दिवांगत आमदार श्री विनायकराव मेटे साहेब यांनी तत्कालीन मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी 25 लक्ष रूपयांचा कृती आराखडा मंजुर केला असून दोन लक्ष रूपये निधी उपलब्ध करून दिलेला आहे. मागील सरकारच्या काळात या कामासाठी निधी उपलब्ध झाला नाही त्यामुळे मंजूर आराखड्या प्रमाणे कामे होण्यासाठी निधि उपलब्ध करून देण्यासह जिल्हयातील वगळेल्या महसुली मंडळांना तात्काळ आग्रीम पिकविमा मंजुर करण्यात यावा,बीड तालुक्यातील मंजूर शाळा खोल्या बांधकाम तात्काळ सुरू करण्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुचना देणे,मंजुर पांदन रस्त्याची कामे बंद असून तात्काळ सुरू करण्याचे संबंधीत यंञणेला तात्काळ आदेश पारीत व्हावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
स्व.मा.आ.विनायकराव मेटे यांनी जिल्ह्यातील खोळंबलेल्या अनेक विकास कामांना चालना देण्याचे काम केलेले आहे.राज्याची राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत जिल्ह्यात विकासाचे राजकारण आणि समाजकारण त्यांनी करून दाखवले.आज त्यांच्या पश्चातही डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंग्राम संघटना तेवढ्याच ताकतीने जिल्ह्यासह शहरातील खोळंबलेल्या विकास कामांसाठी आग्रही भूमिका घेण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विकास कामांसह शहरातील कोळंबलेल्या विकास कामांना गती व चालना देण्यासाठी पालकमंत्री अतुल सावे यांना निवेदन देण्यात आले आहे.
बीड शहरातील रमाई आवास घरकुल योजनेच्या मंजुरी दिलेल्या लाभधारकांना तात्काळ निधी उपलब्ध करून देणे, बीड शहरातील करोडो रूपये खर्च करून शासकीय इमारती उभा केल्या आहेत त्या वापरात येत नाहीत. बुंदेलपुरा जुनीभाजी मंडई येथील मच्छिमार्केट व स्टेडियम कॉम्पलेक्स येथील फ्रुट मार्केट गेल्या आठ वर्षापासुन उभे केले आहेत ते तात्काळ लाभार्थ्यांना वाटप करण्यात याव्यात,बीड शहरातील अनाधिकृत जागा भाड्याने देवून आमदार व नगराध्यक्ष यांचे कार्यकते पैसे वसूल करत आहेत याची चौकशी करून कारवाई व्हावी,शहरातील भुयारी गटार योजनेचे काम अनेक महिण्यापासून बंद आहे से तात्काळ सुरू करण्यात यावे,बीड शहरातील पु.अहिल्यादेवी होळकर सभागृह येथे अनाधिकृत दुकाने काढून त्याचे भाडे वसुल केले जात असून ते पैसे नगर परिषदेकडे जमा केले जात नाही.याची चौकशी व्हावी.बीड शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी अटल अमृत योजनेचे काम जलद गतीन पूर्ण करण्यात यावेत तसेच राज हॉटेल ने नवीन भाजी मंडई चौकापर्यंतचा रस्त्यासह शहरातील इतर 22 रस्ते आमदार व नगराध्यक्ष यांच्या वादात मा. जिल्हाधिकाऱ्यांनी त्या रस्त्यांच्या कामांना स्थगीती दिली आहे ती स्थगिती उठवने अशा स्वरूपाच्या जिल्ह्यातील व बीड शहरातील कोळंबलेल्या विकास कामांना गती व चालना देण्यासाठी शिवसंग्रामच्या वतीने निवेदन देण्यात आले.याप्रसंगी शिवसंग्रामचे मान्यवर नेते पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.