शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झालेले असताना सुद्धा त्यांना नियोजन बैठक महत्वाची
लवकरच जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नाबाबत मुख्यामंञ्यासोबत बैठक लावणार असल्याचे मत मुख्यमंञी यांनी व्यक्त केले
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जिल्ह्यात परतीच्या पावसाने येथील शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले, यामुळे शेतकर्यांची दिपावली गोड झालीच नाही. जिल्ह्याचे पालकमंञी म्हणून अतुल सावे यांनी जिल्ह्याचा पदभार घेतला पण पालकमंञी म्हणून त्यांनी आज पर्यंत जिल्ह्यात काय केले हे पाहणे सुद्धा गरजेचे आहे. आज (ता. ३१) पालकमंञी बीड जिल्ह्यात आले होतै पण त्यांना नियोजन बैठक शेतकर्यांपैक्षा जास्त महत्वाची वाटली. शेतकर्यांना मदतीची अपेक्षा असताना सुद्धा जिल्ह्यातील शेतकर्यांना मदत मिळत नाही. त्यात पालकमंञी फक्त नावालाच जिल्ह्याचा दौरा करताना दिसत आहेत. यामुळे बीडला बीडचाच पालकमंञी हवा म्हणजे जिल्ह्यातील प्रश्न तात्काळ मार्गी लागतील. विशेष म्हणजे आज झालेले बैठकीत अनेक अधिकार्यांनी अपडेट माहितीच दिली नाही. एक अधिकारी आहे तर दुसरा आजारी अशी परस्थिती आजच्या बैठकीत दिसून आली.
बीड जिल्ह्यात सुरवातीला झालेले पावसाने जिल्ह्यातील पिके जोमात आली होती. परंतु परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकर्यांचे अतोनात नुकसान केलेले आहे. झालेले नुकसानीमुळे जिल्ह्यातील शेतकर्यांची दिपावली गोड झाली नाही. सध्या जिल्ह्यातील शेतकर्यांना मदतीची गरज असताना सुद्धा शेतकर्यांना मदत मिळताना दिसत नाही. पालकमंञी म्हणून अतुल सावे यांनी आज पर्यंत विशेष असे काहीच केलेले नाही. आज झालेले बैठकीत सुद्धा त्यांना शेतकर्यांचे प्रश्न महत्वाचे वाटले नाहीत. त्यांना नियोजन बैठकच जास्त महत्वाचे असल्याचे दिसून आले. पालकमंञी शेतकर्यांना कधी मदत करणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.