नेकनूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे मिळाले जीवदान…!
बीड प्रतिनिधी
काल रात्री नेकनूर पोलिसांनी येळंबघाट येथील उड्डाण पुलाजवळ सापळा रचून KA 51 – AD 9009 हा संशयित कंटेनर अडवून तपासणी केली. या कंटेनर मध्ये चौतीस लाख दहा हजार किमतीची 35 देशी गाय व बैल आढळून आले. चौकशी अंती हि जनावरे तामिळनाडू राज्यातील सेलम येथे कत्तल करण्यासाठी जाणार आहेत. असे निदर्शानास आल्या नंतर पोलिसांनी कंटेनर सह जनावरे ताब्यात घेतली. या गाय बैलांना बीड येथील तुकाराम गुरुजी गोशाळेत आश्रय देण्यात आला.
नेकनूर परिसरातील जैताळवाडी शिवारातून जनावराचे व्यापारी मुस्तकिम कुरेशी यांनी ही जनावरे केरळच्या व्यापाऱ्यास विकली होती. दोन देशी गायी व तेहतीस खिल्लार बैल असे पसतीस जनावरे LAYLAND कंपनीच्या कंटेनर क्र. KA 51 – AD 9009 मध्ये जनावरांचे पाय एकमेकांना बांधून कोंबून भरली होती. जनावानाची कोणतीही काळजी न घेता अमानुष पणे वाहतूक केली जात होती. वाहनचालक यांच्याकडे कोणतेही कायदेशीर कागदपत्रे आढळून आली नाहीत. सदरील जनावरे सेलम येथील कत्तलखाण्यात जात होती. नेकनूर पोलिसांनी वेळीच पाठलाग करून, सदरील कंटेनर ताब्यात घेऊन मध्यरात्री बीड येथील तुकाराम गुरुजी गोशाळेत दाखल केली आहेत. नेकनूर पोलिसांच्या या कारवाई मुळे जनतेमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.