गेवराई प्रतिनिधी – माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्याची जय्यत तयारी झाली असून पद्मविभूषण खा.शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या रविवार, दि.९ ऑक्टोबर रोजी मुख्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या अभिष्टचिंतन सोहळ्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवाजीराव (दादा) पंडित अभिष्टचिंतन सोहळा समितीने केले आहे.
माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त गेवराई शहरातील शिवनगरी, र.भ.अट्टल महाविद्यालयाच्या प्रांगणात रामायणाचार्य ह.भ.प.रामराव महाराज ढोक यांची रामकथा, नामांकित किर्तनकारांचे किर्तन यांसह भव्य किर्तन महोत्सव सोंगी भारूड, पोवाडे, संगीत भजन आदी कार्यक्रमांचे दि.६ ते १३ ऑक्टोबर दरम्यान भव्य आयोजन करण्यात आले असून या किर्तन महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उद्या रविवार, दि.९ ऑक्टोबर रोजी माजी केंद्रीय कृषीमंत्री खा.शरदचंद्रजी पवार यांच्यासह केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे पाटील, सिक्कीमचे माजी राज्यपाल खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजीराव (दादा) पंडित यांचा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते ना.अंबादास दानवे, रोहयो मंत्री ना.संदिपानराव भुमरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, माजीमंत्री दिलीप वळसे पाटील, आ.राजेश टोपे, आ.धनंजय मुंडे, आ.प्रकाश सोळंके, आ.सुरेश धस, आ.दिलीपराव देशमुख, आ.संजय बनसोडे, आ.डॉ.राहुल पाटील, आ.सतिष चव्हाण, आ.संदिप क्षीरसागर, आ.बाळासाहेब आजबे, आ.विक्रम काळे, आ.सौ.नमिता मुंदडा, माजी आमदार राजन पाटील, विलासराव खरात, जयवंतराव जाधव यांच्यासह बीड जिल्ह्यातील संत-महंतांची विशेष उपस्थिती असणार आहे. या अभिष्टचिंतन सोहळ्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अभिष्टचिंतन सोहळा समितीच्यावतीने करण्यात आले आहे.