Beed : ज्योतीताई मेटे यांची विधानरिषदेवर निवड करुन राज्य मंञीमंडळात सहभागी करून घ्यावे यासह इतर मागण्या शिवसंग्राम संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आल्या. शिवसंग्राम संघटनेचे प्रदेश प्रवक्ते प्रा.लक्ष्मण नवले , संभाजीनगरचे युवक शहर अध्यक्ष बाळासाहेब भगणुरे पाटील, तसेच सामजिक कार्यकर्ते विराज जोगदंड,. विशाल सोळंके,नागेश दांडाइत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे यांची संभाजीनगर येथे भेट घेऊन शिवसंग्राम संघटनेचे प्रदेश प्रवक्ते प्रा.लक्ष्मण नवले यांनी डॉ.ज्योतीताई मेटे यांची विधानरिषदेवर निवड करुन राज्य मंञीमंडळात सहभागी करून घ्यावे . यासह पोलीस निरीक्षक किरणकुमार भगवानराव बकाले यांना ताबडतोब बडतर्फ करावे तसेच युतीसरकारमध्ये मा.नरेंद्रजी पाटील यांनी आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे काम महाराष्ट्रातील तळागळात पोहचवले आणि अठ्ठेचाळीस हजार उद्योजक उभा केले या कामाची दखल घेत आण्णासाहेब आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष म्हणून श्री नरेंद्र पाटील यांची फेरनेमणूक करण्यात यावी तसेच सारथी विद्यार्थ्याचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावे अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शिवसंग्राम संघटनेच्या मागण्या तातडीने मार्गी लावू असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासित केले . याप्रसंगी संभाजीनगरचे युवक शहर अध्यक्ष बाळासाहेब भगणुरे पाटील, सामजिक कार्यकर्ते विराज जोगदंड,विशाल सोळंके,नागेश दांडाईत व अन्य शिवसंग्राम संभाजीनगरचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.