माजलगाव धरणातील घटना; घटनास्थळी अधिकारी ठाण मांडून
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : माजलगाव येथील धरणात रविवारी (ता. 18) पोहण्यासाठी गेलेले डॉ. दत्तात्रय श्रीमंत फपाळ यांचा मृतदेह 24 तास होऊन सुद्धा मिळाला नाही. त्यांचा मृतदेह शोधण्यासाठी गेलेले एनडीआरएफचे दोन जवान या तलावात अडकले होते. यातील एका जवानाला बाहेर काढण्यात यश आले तर दुसऱ्या जवान बेपत्ता झाला असून त्यांचा शोध सुरु आहे.
डॉ. फपाळ यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी परळी येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी प्रयत्न करुन असून त्यांना मदत करण्यासाठी कोल्हापुर येथील एनडीआरएफचे पथक आले होते. या टिमचे शोध कार्य सुरु असताना यातील जवान राजू मोरे व शुभम काटकर हे पाण्यात अडकले होते. यातील जवान शुभम काटकर यांना बाहेर काढण्यात यश आले असून त्यांच्यावर माजलगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. परंतू यातील जवान राजू मोरे यांना मात्र बाहेर काढण्यात अपयश आले असून त्यांचा शोध सुरु आहे. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी निलम बाफना, तहसीलदार वर्षा मनाळे, मुख्याधिकारी विशाल भोसले, माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित आहेत. यासह परिसरातील नागरीकांनी याठिकाणी गर्दी केली आहे.