विमा कंपनीकडून करण्यात येणार्या अनियमितेबाबत चौकशीची मागणी
बीड प्रतिनिधी – बीड विधानसभा क्षेत्रासह जिल्हाभरात पावसाची सरासरी कमी झाल्यामुळे पीकांचे पुर्णत: नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे महसुल व कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. परंतू शासन परिपत्रकाप्रमाणे 25 टक्के नुकसान भरपाई देत असतांना सर्व मंडळांचा विचार झालेला नसून बीड मतदार संघासह जिल्हाभरातील सर्व मंडळांना समान नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी पत्राद्वारे केली आहे.
बीड विधानसभा मतदार क्षेत्रांतर्गत बीड व शिरूर कासार तालुक्यातील फक्त तीन महसुल मंडळे सोडता इतर मंडळातील शेतकर्यांना चुकीच्या मुल्यांकनामुळे नुकसान भरपाईपासून वंचित ठेवण्यात येत असून, या शेतकर्यांवर विमा कंपनीच्या मनमानीने उघड अन्याय होत आहे. यावर्षी पावसाची सरासरी कमी झाल्याने जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परंतू विमा कंपनीच्या मनमानी कारभार आणि हलगर्जीपणामुळे गतवर्षीही बीड मतदार संघातील मांजरसुंबा महसूल मंडळातील 22 ते 23 गावातील शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळू शकलेली नव्हती. यावर्षीही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून बीड विधानसभा मतदार संघासह जिल्हाभरातील सर्व मंडळांना समान नुकसान भरपाई देण्यात यावी व विमा कंपनीकडून वारंवार होत असलेल्या अनियमिततेबाबत स्तरनिहाय चौकशी व्हावी अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधीपक्षनेते, कृषी मंत्री, मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, कृषी आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.