चंदन पठाण, संजय तिपाले, दिनेश लिंबेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या संघांना ट्रॉफीज़् चे वितरण
बीड (प्रतिनिधी) – बीड जिल्हा सेपक टॅकरा असोसिएशन कडून आयोजीत ३२ व्या राज्य वरिष्ठ पुरुष व महीला सेपक टॅकरा अंजिक्यपद क्रीडा स्पर्धेचा समारोप थाटात संपन्न झाला. विजेत्या संघांना व खेळाडूंना अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, चंदन पठाण, संजय तिपाले, दिनेश लिंबेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ट्रॉफीचे वितरण करण्यात आले.
या स्पर्धेत पुरुष गटातून प्रथम स्थानी नागपूर, द्वितीय स्थानी नांदेड तर तिसऱ्या स्थानी नाशिक व गोंदिया जिल्ह्याचे संघ राहिले. महिला गटातून प्रथम स्थानी सोलापूर, द्वितीय स्थानी सातारा तर तिसऱ्या स्थानी नाशिक व नांदेड चे संघ राहिले. या सर्वांना अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या हस्ते ट्रॉफीज़् चे वितरण करण्यात आले.
यावेळी चंपावती क्रिडा मंडळ चे सचिव गवते, दैनिक लोकमत चे जिल्हा प्रतिनिधी संजय तिपाले, दैनिक दिव्य मराठीचे जिल्हा प्रतिनिधी दिनेश लिंबेकर, बीड दैनिक सिटीझन चे कार्यकारी संपादक चंदन पठाण, तिरुमला ग्रुप इंडस्ट्रीजचे प्रतिनिधी, सीएनएस ग्रुप चे संचालक इरफान खान, डॉ. ललित जीवानी, आंतरराष्ट्रीय खेळाडू डॉ. अमृता पांडे, एआयएमआयएम पक्षाचे ज्येष्ठ नेते अब्दुस सलाम सेठ, जाहेदभाई, सय्यद सैफ़ अली उर्फ लालू भैय्या यांची प्रमुख उपस्थिती होती. ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी कुटे यांच्या तिरूमला ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, सीएनएस क्लब सह आदींनी सहकार्य केले.
सेपक टॅकरा तथा एआयएमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊ आणि सचिव परवेज़ खान यांनी समारोप प्रसंगी या स्पर्धेसाठी सहकार्य करणाऱ्यांसह उपस्थित असलेले सर्व मान्यवर स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्व महिला पुरुष संघांचे, कोच चे अंपायरचे तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे आभार मानले आणि यापुढे ही या स्पर्धा सातत्याने घेतल्या जातील असे म्हटले.
सेपक टॅकराची ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सय्यद सफी, शेख अस्लम, सादेख लोधी, अनिस भाई, अजहर शेख, शेख मुदस्सीर, सय्यद अमन, सोहेल शिकलकर, छोटु भाई, फरहान भाई, सालेम शेख, सय्यद साद आदींनी परिश्रम घेतले.