बीड प्रतिनिधी : शहरात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात व थाटात साजरा होणार आहे. सर्वत्र जल्लोषाचे वातावरण पाहायला दिसत आहे. तसेच आगामी काळात अनेक मोठे सण देखील आहेत. सणासुदीचे दिवस असल्याने नागरिकांना मूलभूत सोईसुविधा पुरविणे हे पालिकेचे आद्य कर्तव्य आहे.गणेशाचे आगमन आज होत आहे. या पार्श्वभूमीवर न.प.मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांना विविध समस्या व मागण्यासंदर्भात युवा नेते डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांनी सहकार्यांसमवेत निवेदन दिले.
यामध्ये एल.ई.डी. स्ट्रीट लाईट्स बंद असतील तेथे तात्काळे नविन बसविणे, पाचवी तार बसवणे, गणेश विसर्जन मिरवणूकी मार्गावरचे खड्डे बुजविणे, स्वच्छतेच्या कामास गती देणे ही सर्व कामे तात्काळ पालिकेने करावीत अशी मागणी केली. तसेच परंपरेनुसार उत्कृष्ट देखावा सादर करणार्या गणेश मंडळास अनुक्रमे 31000, 21000, 11000 हजार बक्षीस देण्याचे जाहीर करावे ही मागणी करताच तात्काळ मुख्याधिकारी यांनी सदरील बक्षीस देऊ करण्याची घोषणा केली.
यावेळी मा.नगरसेवक भास्करराव जाधव, फारुक पटेल, भीमराव वाघचौरे, गणेश वाघमारे, प्रभाकर पोपळे, इकबाल शेख, बाळासाहेब गुंजाळ, रवींद्र कदम, प्रेम चांदणे, शुभम धुत, भैय्या मोरे, रंजित बनसोडे, अॅड.विकास जोगदंड, सादेक शेख, राणा चौव्हान, अॅड.महेश धांडे, नितिन साखरे, ,अमर विद्यागर, शैलेश नाईकवाडे, आशिष काळे, मनोज मस्के, ईसा चाऊस, शारेक झकेरीया, असरार शेख, फयाझ कुरेशी आदी उपस्थित होते.