बीड प्रतिनिधी :- आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन बीड श्री श्री राधा गोविंद मंदिर तर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव चे भव्यदिव्य आयोजन करण्यात आले होते .त्यानिमित्त राधा गोविंद मंदिरामध्ये संपूर्ण दिवस विविध कार्यक्रम पार पडले.
श्री श्री राधा गोविंद मंदिर सावता माळी चौक या ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये व भक्तीभावामध्ये साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पहाटे 4.30 वाजल्यापासून श्री श्री राधा गोविंद यांचे मंगल आरती ,सकाळी 7.30 वाजता शृंगार दर्शन व संपूर्ण दिवस हजारो भाविक भक्तांनी सुंदर शृंगार मध्ये सजलेल्या राधा गोविंद देव यांचे दर्शन घेतले .सायंकाळी पाच वाजल्यापासून मंदिरामध्ये कलश पूजा, अभिषेक करण्यात आला. श्रीमान संतदास प्रभू यांचे श्रीकृष्ण कथा यावर विशेष अध्यात्मिक प्रवचन झाले .श्रीमद् भागवतानुसार भगवान श्रीकृष्ण हे आपल्या लीला भक्तांना आनंद देण्यासाठी वृंदावन धाम मध्ये द्वापार युगामध्ये प्रकट करतात .भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे “परित्राणाय साधुनां विनाशायाचे दुष्परिताम् ! ” या नुसार साधूंचे रक्षण करण्यासाठी व दुष्ट प्रवृत्तींचा विनाश करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण स्वतः पाच हजार वर्षांपूर्वी वृंदावन मथुरा या ठिकाणी अवतरित होतात.सर्व खलु व दुष्ट प्रवृत्तीचे असुर व त्यांचे साथी यांचा विनाश करून पांडवांसारख्या धर्मपरायण भक्तांच्या रूपात या जगाला अत्यंत सामर्थ्यशाली अशा समाज व्यवस्थेची व धर्माची घडी बसवतात ,असे प्रतिपादन त्यांनी केले .त्यानंतर श्री श्री राधा गोविंददेव यांचा पंचामृत्व दही दूध मध यांनी महाअभिषेक करण्यात आला. विद्यापती प्रभू व भक्त निलेश यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यात्मिक नाटिका कृष्ण सुदामा भेट व सांस्कृतिक कार्यक्रम यांचे प्रस्तुतीकरण झाले. रात्री बारा वाजता श्री श्री राधा गोविंद देव यांचे विशेष दर्शनाचा सर्व भाविक भक्तांना लाभ झाला. हजारो भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
आज दिनांक 20 ऑगस्ट रोजी श्रील प्रभुपाल यांचा अविर्भाव दिवस सकाळी नऊ ते बारा या वेळेमध्ये शब्दांजली अभिषेक व श्रील प्रभुपाद यांनी 125 वर्षांमध्ये या जगाला एक अध्यात्मिक प्रेरणा असलेले इस्कॉन संस्थेची स्थापना करून दिली व यात संपूर्ण जगात आज लाखो भक्त सहभागी होत आहेत.
या जन्माष्टमीच्या कार्यक्रमास यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी मंदिराचे अध्यक्ष श्रीमान विठ्ठलानंद प्रभू, यादवेंद्र प्रभू ,साधूकृपा प्रभू ,कृष्णनाम प्रभू ,रोहिणीपुत्र बलराम प्रभू व राधा गोविंद ग्रहस्थ भक्त. तसेच सर्व युवा भक्तांचा विशेष सहभाग होता.अशी माहिती इस्कॉन बीड चे प्रतिनिधी श्रीमान कृष्णनाम दास यांनी दिली.