राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची शिवसंग्रामच्या शिष्टमंडळाने घेतली भेट
बीड : महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी हे शुक्रवार,दि.19 ऑगस्ट रोजी बीड जिल्हा दौऱ्यावर असतांना दुपारी अंबाजोगाई येथे शिवसंग्रामचे पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत स्वर्गीय आमदार विनायकरावजी मेटे साहेब यांच्या सुविद्य पत्नी डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांना महामहीम राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषद सदस्यपदी नियुक्ती मिळणेबाबतचे निवेदन दिले.
स्व. मा. आ. विनायकरावजी मेटे यांच्या निधनानंतर त्यांनी हाती घेतलेले सामाजिक व राजकीय कार्य अधुरे राहिलेले आहे. त्यांनी समाजोन्नतीचे पाहिलेले स्वप्न पुर्ण करण्यासाठी त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांना संधी मिळावी. डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे ह्या डॉक्टर असुन गेले 28 वर्षे प्रशासकीय सेवेत त्यांचे उल्लेखनीय काम आहे. शिवसंग्राम परिवारातील कार्यकर्त्यांच्या आणि मराठा समाजाच्या आग्रहाखातर त्यांनी आता स्व. मेटे साहेबांचे आधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी समाजकार्य करावे अशी भावना आहे या कार्यात त्यांना बळ मिळावे यासाठी येणाऱ्या काळातील ज्या विधान परिषद सदस्यांच्या नेमणुका माननीय राज्यपाल महोदयांच्या अधिकारात होणार आहेत. त्यामध्ये डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा अशी शिवसंग्राम संघटना, मराठा क्रांती मोर्चा बीड जिल्हा व महाराष्ट्रातील अनेक संघटनेच्या वतीने मागणी होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी भारतीय संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकरअप्पा कोलंगडे शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायणराव काशीद व मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक बी.बी जाधव हे उपस्थित होते .