रानभाजी महोत्सवास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा),बीड , कृषी विज्ञान केंद्र, खामगाव, सौ के एस के कृषी महाविद्यालय, मविम, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांचे संयुक्त विद्यमाने व मा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, श्री बी के जेजुरकर व प्रकल्प संचालक आत्मा श्री एस एम साळवे यांचे मार्गदर्शना खाली आज दि 12/08/2022 रोजी जिल्हास्तरीय *रानभाजी महोत्सव 2022* डॉ. बाबासाहेब आंबेडकर, समाजकल्याण भवन,नगर रोड बीड येथे आयोजित करण्यात आला. या वेळी कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्यक्ष म्हणून मा जिल्हाधिकारी श्री राधाबिनोद शर्मा तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि प बीड श्री अजित पवार, मा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि प बीड श्री वासुदेव सोळुंके, मा मुख्य लेखा व वित्त अधिकारी जि प बीड श्री जाटाळे, मा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि प बीड श्री विजयकुमार देशमुख, मा श्री गोविंद साळुंके, सहसचिव सौ के एस के कृषी महाविद्यालय,बीड, मा श्री अनिरुद्र सानप ,गट विकास अधिकारी, पं स बीड , श्री कल्याण कुलकर्णी, अध्यक्ष रोटरी क्लब बीड, सिद्धार्थ सोनवणे , सर्पराज्ञी वन्यजीव हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्री एस एम साळवे प्रकल्प संचालक आत्मा बीड यांनी शासनाने रानभाज्या चे महत्व प्रसारित करणे करीता व विपणन साखळी निर्माण करणे करिता रानभाजी महोत्सव दिनांक 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत साजरा करण्याकरिता मान्यता दिलेली आहे. मानवी आरोग्यामध्ये सकस अन्नाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सकस अन्नामध्ये विविध भाज्यांचा समावेश असतो. रानातील म्हणजे जंगलातील तसेच शेतशिवारातील नैसर्गिकरित्या उगवल्या जाणाऱ्या रान पालेभाज्या, फळभाज्या, कंद भाज्यांमध्ये विविध प्रकारचे शरीराला आवश्यक असणारे पौष्टीक अन्नघटक व औषधी गुणधर्म असतात. तसेच सदर रानभाज्या नैसर्गिक रित्या येत असल्यामुळे त्यावर रासायनिक कीटकनाशके बुरशीनाशके फवारणी करण्यात येत नाही त्यामुळे पूर्णपणे नैसर्गिक असलेल्या या संपत्तीचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. त्यांचे आरोग्य विषयक महत्त्व व माहिती जास्तीत जास्त ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना होणे साठी व विक्री व्यवस्था करून त्यांच्या विक्रीतून शेतकऱ्यांनाही काही आर्थिक फायदा होण्यासाठी लोकांमध्ये याबाबत जनजागृती करण्यासाठी दिनांक 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये बीड जिल्ह्यातील तालुका निहाय रानभाज्या महोत्सव कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय व सामाजिक संस्था, उमेद महाराष्ट्र् राज्य् ग्रामिण जीवनोन्न्ती अभियान, जिल्हा अभियान व्य्वस्थापन कक्ष, बीड, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहेत.
यामध्ये ठीक ठिकाणी रानभाजी व फळांची वैशिष्ट्ये गुणधर्म व आरोग्यासाठी उपयोग संवर्धन पद्धती भाजीची पाककृती (रेसिपी) याची सचित्र माहिती दाखवण्यात येणार आहे याची तांत्रिक माहिती व कृती याचीही माहिती देण्यात येणार आहे तसेच ठीक ठिकाणी पाककृती करुन महिला बचत गट यांच्यामार्फत कार्यक्रम स्थळी रानभाज्यांचा अस्वाद घेण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे तरी नागरिकांनी रानभाज्यांचा अस्वाद घेऊन महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
डॉ. गोविंद सोळुंके यांनी कृषी महाविद्यालय व कृषी विभाग यांचे मार्फत आयोजित कार्यक्रम व त्याचे फायदे या विषयी माहिती सांगत रानभाजीचे आहारातील अनन्य साधारण महत्व असल्याचे विशद केले.
श्री सिदार्थ सोनवणे यांनी रानभाजी त्याचे फायदे व औषधी उपयोग या बाबत माहिती सांगितली. श्री सोळुंके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि प बीड यांनी त्यांचा अहमदनगर जिल्ह्यातील त्यांचा अनुभव व तेथे असलेल्या बीजमाता राहीबाई पोपरे यांचे कामाचे गौरव करत त्या प्रमाणे बीड जिल्ह्यात सुद्धा कोणी राहीबाई होणे अपेक्षित आहे. आज सध्याच्या काळात रानभाजी व गावाकडची आजी या गोष्टीचा विसर होत चाललेला दिसून येतो.
मा जिल्हाधिकारी बीड श्री राधाबिनोद शर्मा यांनी सध्याची पिढी ही पिझ्झा, बर्गर कडे वळत असून सदर अन्न हे शरीरासाठी हानी कारक असून सर्व नवीन पिढीला रानभाजी काय आहेत व त्याचे आरोग्यातील महत्व या बाबत कृषी विभागाने आयोजित केलेला रानभाजी महोत्सव स्तुत्य कार्यक्रम असून कृषी विभाग वेळोवेळी शेतकऱ्यांना व नागरिकांना मार्गदर्शन करत राहतो याचा आनंद होतो असे मत व्यक्त करत सर्व नागरिकांना या रानभाजी चे महत्व या बाबत बीड जिल्ह्यात नागरिकांना प्रचार व प्रसिद्धी करून मार्गदर्शन करावे व जास्तीत जास्त नागरिकांनी व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
श्री बी आर गंडे, तालुका कृषी अधिकारी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले प्रदर्शन स्थळी बीड जिल्ह्यातील 36 प्रकारच्या रानभाजी उपलब्ध होत्या तर 11 प्रकारच्या रानभाजी विक्रीस उपलब्ध होत्या . तसेच मा साहेब शेतकरी उत्पादक कंपनी यांनी लाकडी घाण्याचे तेल विक्रीस ठेवले होते. या वेळी विठाई महिला बचत गट आंथरवान पिंपरी यांचे मार्फत रणभाजी चा आस्वाद घेण्याकरिता विविध प्रकारच्या भाज्या व दही धपाटा, रानमेवा उपलब्ध होता त्याचा नागरिकांनी आनंदाने आस्वाद घेतला
सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करीता सर्व कृषी व आत्मा कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.