बीड प्रतिनिधी बीड दिनांक 13 ऑगस्ट शनिवार रोजी बीड च्या लोकप्रिय खासदार प्रितमताई मुंडे यांनच्या उपस्थितीत सकाळी 9 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनच्या पुतळ्याला अभिवादन करून तिरंगा झेंड्याला सलामी देऊन तिरंगा रॅलीची सुरुवात खासदार प्रितम ताई च्या उपस्थिती होणार आहे.
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली आहेत,देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र भाई मोदीजी यांच्या संकल्पनेतुन आझादी का अमृत महोत्सव संपूर्ण भारत देशात साजरा होत आहे. आपल्या देशाची आन,बाण,शान आपला राष्ट्रध्वज तिरंगा,देशाचा अभिमान आपल्या सर्व देशवासीयानि दि.13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट आपल्या घरावर,कार्यालयावर फडकवला पाहिजे.
इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून भारत देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली.क्रांती वीरांमुळे सुद्धा भारत देश स्वतंत्र मिळाले.त्यामुळे आज आपण स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत.प्रत्येक भारतीयानि 75 व्या अमृत महोत्सवी आपल्या घरावर तिरंगा फडकवावा.
शनिवार सकाळी डॉ. आंबेडकर पुतळ्यापासून माळवेस,धोंडीपुरा,बलभीम चॊक,कारंजा रोड,बशीर गंज, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ.आंबेडकर सामाजिक न्याय भवन येतें तिरंगा रॅलीचा समारोप होईल.
बीड शहरातील विध्यार्थी,पालक, सामाजिक संघटना,डॉक्टर,वकील, स्काऊट गाईड,निवृत्त लष्करी जवान,पोलीस कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक,आरोग्य कर्मचारी,महिला,शिक्षक बांधवानी तसेच भारत देशावर प्रेम करणाऱ्या सर्वांनीच जास्तीत जास्त संख्येने या रॅलीत सहभागी होऊन तिरंगा रॅलीची शोभा वाढवावी असे आवाहन भारतीय जाणता पार्टीचे तालुका अद्यक्ष स्वप्नील गलधर यांनी केले आहे.