बीड प्रतिनिधी : बीड नगर परिषदेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेना कामाला लागली आहे. थेट नगराध्यक्षांच्या पदासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी मैदानात उतरावे असे साकडे शिवसैनिकांनी घातले आहे.
बीड जिल्ह्यात बीड नगर परिषद ही अव्वल असून जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या या नगर परिषदेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय झाल्याने थेट जनतेतून नगराध्यक्ष पदासाठी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी मैदानात उतरावे असे साकडे शिवसैनिकांनी घातले आहे. गेल्या तीस वर्षापासून जिल्हाप्रमुख अनिल जगताप शिवसेनेचे निष्ठेने काम करत आहेत. संपूर्ण शहरात अनिल जगताप यांची एक वेगळी ओळख आहे. तरूणांमध्ये अनिल जगताप यांची क्रेझ आहे. नगराध्यक्ष पदासाठी एक आश्वासक चेहरा म्हणून शिवसैनिकांसह बीड शहरवासी त्यांच्याकडे पाहत आहेत. घराघरात ओळखीचा आणि आपलासा वाटणारा हा चेहरा नगर परिषदेचा अध्यक्ष व्हावा अशी इच्छा शिवसैनिकांची आहे. शिवसैनिकांच्या वतीने शहरप्रमुख सुनील सुरवसे यांनी रविवारी असंख्य शिवसैनिकांसोबत जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांची भेट घेवून आपण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी मैदानात उतरावे असे साकडे घालुन त्यांना आग्रह करणार आहोत .नगराध्यक्ष पदाच्या या निवडणुकीत अनिल जगताप मैदानात उरतले तर एक वेगळे चित्र पहाण्यास मिळणार आहे असे सुनील सुरवसे यांनी म्हटले आहे.