पंढरीची वारी आहे माझे घरी। आणिक न करी तीर्थव्रत ।। आज पुत्रदा एकादशी श्रावण सोमवार निमित्त पंढरपूर नगरीमध्ये अनेक वारकरी बहुसंख्यन विठुरायाच्या दर्शनासाठी जागतिक तीर्थ म्हणून ज्यांची ओळख करून दिली.अशी भूवैकुंठ पंढरीची वारी म्हणजे….. भक्तितत्वाचा आविष्कार म्हणजे पंढरीची वारी.. प्रेमसुखाची अनुभती घेण्याची सहज स्थिती म्हणजे पंढरीची वारी…परब्रह्माला साठवीत विवेकाच्या दिशेने होणारी उन्नत वाटचाल म्हणजे पंढरीची वारी… मानवी जीवनात सकारात्मक परिवर्तनाच्या दिशेने पडणारे विवेकी पाऊल म्हणजे पंढरीची वारी…जीवनातली सारी दुःख ,याताना, विसरून आनंद डोह बनून आनंदतरंग अनुभवण्याची स्थिती म्हणजे पंढरीची वारी…..
या वारीसाठी जगभरातून अनेक भाविक सुस्नात होण्यासाठी येतात ,त्याचं कारण तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक। विठ्ठलची एक देखलिया।। पंढरी तीर्थक्षेत्राचा महिमा हा अलौकिक आहे शंकर सांगे ऋषी जवळी। सकळतीर्थे मध्यान काळी । येती पुंडलिका जवळी । करती अंघोळी वंदीती चरण।।
जगातील सर्व तीर्थ मध्यान काळामध्ये या पंढरी तीर्थक्षेत्रामध्ये येऊन राहत असतात म्हणून श्री तुकोबाराय सांगतात. तीर्थे केली कोटीवरी । नाही देखिली पंढरी । जळो त्याचे जीयाले पण । तंव नदेखे समचरण ।। ज्यांनी जन्माला येऊन एकदा ही पंढरी नाही पाहिली त्यांच्या जीवनाला आगो | जेव्हा नव्हते चराचर। तेव्हा होते पंढरपूर।। अशा प्रकारचा या पंढरी क्षेत्राचा महिमा सर्वोत्तम तीर्थ म्हणून सांगितला आहे म्हणून… माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर जीवनात एकदा तरी ही भूवैकुठ पंढरी आपल्या डोळ्यांनी पहावी आणि आपल्या जीवनाची कृतकृत्यता प्राप्त करून घ्यावी.
*युवा कीर्तनकार ह .भ .प.-अक्षय* *महाराज तळेकर आळंदी (देवाची)