शिवसंग्रामच्या मागणीची दखल नगरपालिकेने घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल..शिवसंग्राम
बीड : बीड नगर परिषद् हद्दीमधील प्रभाग क्र. 24, व 25 मधील नागरिकांसाठी मुलभुत सुविधा पुरविणे व रस्ते, नाले दुरुस्ती करणे या कामासंदर्भात शिवसंग्राम, प्रभाग क्र. 25 चे विभाग प्रमुख, सातिराम ढोले, शिवसंग्राम नेते हनुमंत पवार व अशोक ढोले यांच्यावतीने मुख्याधिकारी नगरपरिषद बीड यांना निवेदन देण्यात आले.यावेळी त्यांच्या समवेत राहुल ढोले,निवांत भांडवले व अन्य शिवसंग्राम पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसंग्रामच्या वतीने देण्यात आलेल्याा निवेदनात बार्शी नाका, ढोले वस्ती, गलधरवस्ती ते ईमामपूर रोड वरील विद्युत पोलवरीले बंद असलेले पथदिवे तात्काळ चालु करण्यात यावे. बार्शी नाका, ढोले वस्ती, गलधरवस्ती ते ईमामपूर रोड सदरील भागात पावसामुळे नाली, रस्ते, कचरा साचलेल्यामुळे तात्काळ साफसफाई करण्यात यावी. बार्शी नाका येथील गोलाई येथील साफसफाई करुन सुशोभीकरण करण्यात यावे. इमामपुर रोड, ढोले वस्ती, गलधर वस्ती भागातील अमृतजल योजनेचे काम पुर्ण न झाल्याने अद्यापपर्यंत पिण्याचे पाणी चालु करण्यात आलेले नाही. ते काम लवकरात लवकर करण्यात यावे.तसेच प्रकाश आंबेडकर नगर, ढोले वस्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा रस्ता नसल्यामुळे या वर्दळीच्या भागातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे सदरील भागात लवकरात लवकर रस्त्याचे काम करण्यासाठी सूचना द्याव्यात. या निवेदनाच्या मागण्यासह शिवसंग्रामच्या शिष्टमंडळानी प्रभाग क्रमांक २४ व २५ मधील या भागात मुख्याधिकारी साहेबांनी भेट देवुन नागरिकांच्या समस्या जाणुन घ्याव्यात अशी विनंतीही यावेळी करण्यात आली.