केज तालुक्यातील टाकळी येथे पंकज कुमावत यांची कारवाई
केज : तालुक्यातील टाकळी येथे अनेक पिढ्यापासुन नागपंचमी या सणाच्या अनुषंगाने गावामध्ये सणाच्या चार दिवसा अगोदर पासुन जुगार नावाचा खेळ गावातील तसेच इतरचे पुरुष मंडळी खेळत असतात त्याच परंपरेनुसार याही वर्षी नागपंचमी सणाच्या पहिल्याच दिवशी गावात सुरु असलेल्या जुगारावर आयपीएस पंकज कुमावत यांनी करवाई करत जुगार्यांना चांगलाच दणका दिला आहै.
केज तालुक्यातील टाकळी येथे झालेल्या कारवाईत अनेक धनदांडगे जुगार खेळाडू यांना ताब्यात घेत केज पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. यात अनेक दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टिमने केली. यात एकूण किती मूद्देमाल व किती जणांवर गुन्हे नोंद करण्यात आहे याची माहिती मिळू शकली नाही.