बीड – आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून मोर्चेबांधणी करण्याच्या दृष्टीने शिवसंग्रामची जिल्हास्तरीय आढावा बैठक शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष मा.आ. विनायकराव मेटे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश उपाध्यक्ष राजनजी घाग,भारतीय संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर आप्पा कोलंगडे , जिल्हाध्यक्ष नारायण दादा काशीद, शिवसंग्रामचे जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे सुहास पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अँड. मनीषाताई कुपकर,अल्पसंख्यांकचे ज्येष्ठ नेते खालेक पेंटर,शहराध्यक्ष ॲड.राहुल मस्के,ऊसतोड कामगार नेते बबनराव माने, यांच्या प्रमुख उपस्थितीत समर्थ मंगल कार्यालय, नगर रोड, बीड येथे संपन्न झाली. या बैठकीसाठी जिल्हाभरातून पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसंग्राम जिल्हा कार्यकारिणी बैठकीचे प्रस्ताविक जिल्हाध्यक्ष नारायणदादा काशीद यांनी केले.जिल्ह्यातील विविध आघाडी वसेल बाबत त्यांनी सविस्तर माहिती मांडली.शिवसंग्राम पक्ष संघटना बळकटी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा ताळमेळ याबाबतही त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.जिल्ह्यातील सर्व तालुकाप्रमुखांना तालुक्याचे जाहीर झालेले आरक्षण व त्यांनी केलेले तयारी याबाबत आढावा सादर करणेबाबत आवाहन करण्यात आले त्यानुसार बीड तालुका नवनाथ प्रभाळे, शिरूर तालुका माऊली शिंदे ,माजलगाव तालुका उत्तम पवार ,आष्टी तालुका ज्ञानेश्वर दादा चौधरी,केज तालुका नामदेव गायकवाड ,अंबाजोगाई तालुका धणेश गोरे,गेवराई तालुका कैलास माने ,वडवणी तालुका सुग्रीव मुंडे आदींनी तालुका निहाय आढावा घेऊन मनोगत व्यक्त केले.तसेच ॲड.राहुल मस्के यांनी बीड शहराची प्रभाग रचना आरक्षण वआगामी नगरपालिका निवडणूक अनुषंगाने करावयाची तयारी याबाबतपक्षश्रेष्ठींना माहिती दिली.विद्यार्थी आघाडी अक्षय माने,युवक आघाडी रामहरीभैय्या मेटे,अल्पसंख्यांक आघाडी फिरोज पठाण,किसान आघाडी राजेंद्र आमटे ,अल्पसंख्यांक विभाग सुनील शिंदे,
महिला आघाडी ॲड. मनीषाताई कुपकर यांनी देखील अंगीकृत संघटनेच्या कामकाजाबाबत लेखाजोखा यावेळी सादर केला.
जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निवडणुकीचे बिगुल वाजले असुन शिवसंग्रामची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली निवडणुकी संदर्भात विविध मोर्चे बांधणी करण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये आ . विनायकराव मेटे यांनी जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भात निवडणूक गटप्रभारी म्हणून भारतीय संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर आप्पा कोलंगडे,शिवसंग्राम चे जिल्हाध्यक्ष नारायण दादा काशीद,युवक जिल्हाध्यक्ष रामहरी मेटे,ज्येष्ठ नेते खालेक पेंटर व शहराध्यक्ष एडवोकेट राहुल मस्के यांची निवड जाहीर केली.तसेच बीड तालुका प्रभारी म्हणून महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनाही जबाबदारी दिली
यामध्ये बहिरवाडी प्रभारी नारायण काशीद बीड शहर प्रभारी अनिल भुमरे, लिंबागणेश प्रभारी सचिन कोटुळे लिंबागणेश सह प्रभारी बबनराव माने चौसाळा प्रभारी रामदास नाईकवाडे पिंपळनेर प्रभारी गोपीनाथ घुमरे पाली प्रभारी ज्ञानेश्वर कोकाटे नेकनूर प्रभारी फिरोज पठाण सह प्रभारी सुभाष जाधव नाळवंडी प्रभारी योगेश शेळके नाळवंडी सहपरिभारी आसाराम आमटे नवगन राजुरी प्रभारी बबनराव जगताप आदीकडे बीड तालुक्याची निवडणुकी संदर्भात प्रभारी म्हणून मा.आ.विनायकराव मेटे यांनी निवड जाहीर केली
शिरूर तालुका प्रभारी म्हणून मातोरी गटाचे प्रभारी ज्ञानेश पानसंबळ सहप्रभारी म्हणून राजेश घुंगरड पाडळी गणाचे प्रभारी माऊली शिरसाट व रायमोहा गटाचे प्रभारी राहुल बनगर.केज तालुका प्रभारी म्हणून विडा गटाचे प्रभारी साक्षीताई हांगे विडा गटाचे सहप्रभारी शिवाजी वाघमारे नांदूर घाटचे प्रभारी लिंबराज वाघ चिंचोलीचे प्रभारी बाळासाहेब गलांडे युसुफ वडगावचे प्रभारी एडवोकेट मनीषाताई कुपकर,गेवराई तालुका चे प्रभारी पदाधिकारी धोंडराई प्रभारी डॉ. निकम, पाचेगाव प्रभारी दत्ता जाधव यांच्याही निवडी यावेळी जाहीर करण्यात आल्या
वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन :
शिवसंग्रामच्या कार्यकारिणी बैठकीदरम्यान काही पदाधिकाऱ्यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करून त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत शुभेच्छा देण्यात आल्या. या मध्ये युवानेते मनोज जाधव , नेते ज्ञानेश पानसंबळ , सौ.साक्षीताई हांगे यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
जाहिर प्रवेश :
आजच्या या कार्यक्रमांमध्ये शिवसंग्राम मध्ये जाहीर प्रवेश करण्यात आले यामध्ये युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष रामहरी भैय्या मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली व गणेश खांडेकर यांच्या पुढाकाराने अनेक युवकांचा शिवसंग्राम मध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला . तसेच केज तालुकाध्यक्ष नामदेव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ .उत्तम खोडशे सर यांच्यासह अनेकांचा प्जाहीर प्रवेश करण्यात आला. ॲड.छाया कांबळे यांचा शिवसंग्राम मध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला तसेच गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील नितीन पखाले व आबा शिंदे व माजलगाव तालुक्यातीलभाजपचे तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत सौंदर यांचाही शिवसंग्राम मध्ये जाहीर प्रवेश घेण्यात आला.पुढील कार्यासाठी सदिच्छा देण्यात आल्या .
आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपरिषद, नगरपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सत्तेत वाटा मिळावा यादृष्टीने सर्वांनी कामाला लागावेअशा सूचना शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष मा.आ. विनायकराव मेटेे यांनी दिल्या.पक्ष वाढीसाठी सभासद नोंदणी सह गाव तिथे शाखा निर्माण करण्याच्या सूचना देत पक्षाच्या ध्येय धोरणाची माहिती सामान्यांपर्यत पोहचविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने मेहनत घ्यावी. सभासदाच्या नोंदणीवर भर देण्यात यावी. पक्षाची बांधणी मजबूत करण्याच्यासंबधीचे नियोजन, या बाबींसह कार्यकर्त्यानी जनतेच्या प्रत्येक प्रश्नाकडे वाचा फोडण्याच्या दृष्टीने पक्षाच्या वतीने आंदोलने, मोर्चे इत्यादी कार्यक्रम हाती घेण्यात यावेत असेही मा.आ.विनायकराव मेटे यांनी अध्यक्षीय समारोप करताना सांगितले.
यावेळी येणाऱ्या काळात पक्ष मजबुती व वाढीव संघटनवर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष ,शहराध्यक्षासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थित होती.