बीड : मराठवाड्यातील बडे नेते अर्जुन खोतकर, माजी मंञी सुरेश नवले, माजी खासदार सुरेश जाधव यांनी रविवारी (ता. ३१) मुख्यमंञी एकनाथराव शिंदे, शिवसेना नेते भाई रामदासजी कदम, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेबजी दानवे तसेच माजी मंत्री उदयजी सामत यांच्या उपस्थित शिवसेनेत जाहिर प्रवेश केला. यासह शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख चंद्रकांत नवले यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाभरातील माजी तालुका प्रमुख, शहर प्रमुख, उप शहर प्रमुख, उप तालुका प्रमुख, विभाग प्रमुख, शिवसेना महिला आघाडी, शेतकरी सेना, एस.टी. कामगार सेना, भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी पदाधिकारी यांच्यासह बीड मतदार संघातील प्रमुख बहुसंख्य कार्यकर्त्यांनी सुरेश नवले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश केला.
सिल्लोडमधील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी मंञी सुरेश नवले यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुरेश नवले यांनी बीड जिल्ह्यात शिवसेनेला बळ देत जिल्हा भगवामय केला होता. एक कार्यकर्त्यापासून सुरु झालेला प्रवेश मंञी होई पर्यंत सुरुच होता. अंतर्गत वादामुळे त्यांना शिवसेना पक्ष सोडावा लागला होता. यानंतर त्यांनी काॅंग्रेस मध्ये प्रवेश केला होता. यासह सुरेश नवले मिञ मंडळाच्या माध्यमातुन सुरेश नवले हे बीड मतदार संघात परत जोमाने काम करत आहेत. एकनाथराव शिंदे मुख्यमंञी झाल्यानंतर त्यांचे समर्थन करत त्यांच्या पदाधिकार्यांनी बीड मध्ये फटाके फोडत आनंद साजरा केला होता. माजी मंत्री अब्दुलजी सत्तार, अर्जुन खोतकर, सुरेश नवले मिञ आहे. सुरेश नवले यांनी मुख्यमंञी एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला आहे. भविष्यात बीड मतदार संघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लाऊ आसे मत माजी मंञी सुरेश नवले यांनी व्यक्त केले.