विश्वासघातकी आमदाराला सोडचिट्टी देत राष्ट्रवादीचे ताकतीचे सुभेदार जयदत्त अण्णांच्या तंबूत दाखल!
लवकरच भव्य दिव्य प्रवेश सोहळा
बीड/प्रतिनिधी
बीड मधील आमदार संदीप क्षीरसागर यांचे खंदे समर्थक समजले जाणारे आसाराम गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वीच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यावर विश्वास ठेवून सोबत काम करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज परत एकदा मतदार संघासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली जाणारी बहिरवाडी ग्रामपंचायत सरपंच बाजीराव बोबडे उपसरपंच बबन डोईफोडे आणि सर्वच सदस्यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर,नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर, युवा नेते डॉ योगेश भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे येत्या काही दिवसातच भव्य दिव्य प्रवेश सोहळा होणार आहे,ओला दुष्काळ पाहण्यासाठी आलेल्या अजित दादांना बीडच्या राष्ट्रवादीतील कोरडा दुष्काळ बघण्याची वेळ आली असून
विश्वासघातकी आमदाराला सोडचिट्टी देत राष्ट्रवादीचे ताकतीचे सुभेदार माजीमंत्री जयदत्त अण्णांच्या तंबूत दाखल! होत आहेत आम्ही जयदत्त अण्णांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून परत जोमाने कामाला सुरुवात करणार असल्याचे बोबडे,डोईफोडे यांनी बैठकीत सांगितले आहे,सूत्रसंचालन नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी केले
यावेळी बोलताना माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, विश्वास हा शब्दच नाहीसा होऊ लागला आहे पुन्हा एकदा हे सिद्ध झाल्यामुळे अनेक जण पुन्हा परतीच्या मार्गावर येऊ लागले आहेत बहिरवाडीतून बोबडे आणि त्यांचे सर्व ग्रामपंचायत सदस्य बरोबर येणार आहेत पुनश्च एकदा हरिओम होऊ लागला आहे बदल्या काळात अनेक जण चांगले होते पण आता ज्या विश्वासाने ते परत आले त्यांना योग्य न्याय आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील सत्तेचा व पैशाचा माज फार काळ टिकत नसतो माणूस जोडून ठेवत सत्तेचा उपयोग सर्वसामान्यांसाठी व्हायला हवा नेतृत्व करत असताना कार्यकर्ता जपला पाहिजे सगळच माझं आणि मला हवं ही वृत्ती टिकत नसते दीर्घकालीन विचार ठेवून राजकारणात राहावे लागते सत्ता असताना जी जी लोकोपयोगी कामे करायला हवी ती आपण करून दाखवले आहेत श्रेय कुणी घ्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो पण आपण जे केलं ते जनतेसमोर मांडला आहे लहान लहान प्रश्न असतात त्यांची वेळेत सोडवणूक नाही केली तर आपलाच माणूस त्रास सहन करतो हा विचार ठेवावा लागतो बेड नगरपालिका हद्दीच्या बाहेरचे जिथे नागरिक राहतात त्यांनाही सुविधा पुरवण्याची काम आपण करत असतो काही दिवसापूर्वी आसाराम गायकवाड यांच्याशी चर्चा झाली दुरावलेल्या कार्यकर्त्यांच्या हे लक्षात आल्यानंतर वेळ आल्यावर करेक्ट कार्यक्रम करण्याचा निर्णय या लोकांनी घेतला ही फार मोठी गोष्ट आहे ज्या गोष्टी नियतीला मान्य होऊ लागल्या त्या आता समोर येऊ लागले आहेत असे सांगून येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असे आश्वासनही माजी मंत्री क्षीरसागर यांनी दिले
बैठकीस दिनकर कदम विलास बडगे अरुण डाके गणपत डोईफोडे ऍड राजेंद्र राऊत बाबुशेठ लोढा डॉ योगेश क्षीरसागर, अमर नाईकवाडे,फारुख पटेल आसाराम गायकवाड,तुषार घुमरे,नागसेन मस्के अशोक बोबडे विशाल बोबडे जितू बोबडे गणेश बोबडे समाधान शेलार खंडू जाधव दीपक पाटोळे बाळू शिंदे अमोल मदने यांच्यासह हजारो समर्थक उपस्थित होते