आष्टी प्रतिनिधी :आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथील गौतम लोखंडे हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी उचल घेऊन
ऊस तोडणीसाठी सोमेश्वर कारखाना येथे गेले आणि गेल्या पाच वर्षापासून ते तेथेच स्थायिक झाले कारखान्याच्या सिझन मध्ये ऊस तोडणी व हाफ सीझनमध्ये मोलमजुरी करून आपलं कुटुंब चालवतात त्यांना दोन मुलं त्यातील इयत्ता सातवीत शिकत असलेला कार्तिक वेळ मिळेल तेव्हा आई-वडिलांना ऊस तोडणी यासाठी मदत करत असत व उसाच्या फडात इकडून-तिकडे उड्या मारत-मारत डान्स करु लागला आहेत त्याचे शिक्षक योगेश ननवरे यांनी त्याला डान्सचे धडे शिकवायला सुरुवात केली आणि त्यात हा कार्तिक अगदी पारंगत होत गेला आणि त्याचे झी मराठी या वाहिनीवर सुरू झालेला डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमांमध्ये दिनांक 12 रोजी सलेक्शन होत आता तो आपली डान्सची अदाकारी दाखवून संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना भुरळ घालत आहे.आष्टी तालुक्यातील डोंगरगण सारख्या खेडेगावातील ऊसतोड मजुराचा मुलगा टीव्हीवर झळकत असल्याने कार्तिकवर डोंगरगण व आष्टी तालुक्यातील जनतेतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.