शिवसंग्राम महिला आघाडीच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करणार..अँड.मनिषाताई कुपकर
बीड : आ.विनायकराव मेटे यांच्या समाजकार्याने प्रभावित होऊन पोष्टमन कॉलनी, कॅऩॉल रोड,बीड येथील बहुसंख्य महिलांचा बुधवार,दि.27 जुलै रोजी बीड नगरपालिकेतील सत्ता परिवर्तनासाठी,शहरीकरणाच्या सर्व सुविधा मिळवण्यासाठी शिवसंग्राममध्ये जाहीर प्रवेश झाला.शिवसंग्राम पक्षसंघटना विस्ताराचे धोरण निरंतर चालू आहे. जिल्ह्यातील विविध स्तरातील, जातीधर्मातील युवकांना,महिलांना आ.विनायकराव मेटे यांच्या नेतृत्वात सहभागी करून घेण्याचा संकल्प शिवसंग्रामच्यावतीने करण्यात आलेला आहे.
शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष, आ.विनायकराव मेटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अँड.मनीषाताई कुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडीच्या बीड शहर उपाध्यक्षा संगीताताई ठोसर यांच्या विशेष प्रयत्नाने,प्रभाग क्रं.01 चे प्रमुख हरिश्चंद्र ठोसर, शिवसंग्रामच्या गेवराई महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा साधनाताई दातखिळ, रेखाताई तांबे,सुभद्राताई बंदरे, संध्याताई लांगोरे यांच्या उपस्थितीत पोस्टमन कॉलनी,कॅनॉल रोड बीड येथील
सुवर्णाताई दरेकर,मिनाताई करपे.उषाताई करपे,कालिंदाताई सरडे. गिरिजाताई विद्यागर. दैवशालाताई आडसूळ. सुनिताताई शिंदे. सत्यभामाताई तारडे इंदुबाई सपकाळ सगजानताई दाणे. सुरेखाताई कुलकर्णी. प्रमिलाताई वाळुंजकर. वर्षाताई बेद्रे, ललिताताई महानोर, राधाताई बेद्रे,गीताताई मोरे, अर्चनाताई माने, पठाण आफरिन, मनिषाताई सावंत, निर्मलाताई किंबहुने, जयश्रीताई देशपांडे, ज्योतीताई सुरवसे, ज्योतीताई काळे, ॠतुजाताई माने, मुजांळताई. कुलकर्णीताई यांच्यासह
अनेक रणरागिनींचा शिवसंग्राममध्ये जाहीर प्रवेश घेण्यात आला.
यावेळी महिलांच्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर बोलतांना अँड.मनीषाताई कुपकर यांनी सांगितले की, शिवसंग्राममध्ये मा.आ.विनायकराव मेटे साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व जातीधर्माचे पदाधिकारी कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करत आहेत शिवसंग्राम गोरगरीब, दीन- दलित, वंचित, गरजवंताच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी दिवस- रात्र परिश्रम करत आहे. सर्वसामान्य महिलांचे अडचणी सोडविण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शिवसंग्राम महिला आघाडीच्या वतीने लवकरच एक उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की,येत्या काळात बीड नगरपालिका काबीज करणे हे लक्ष्य आपल्यासमोर आहे हे गृहीत धरून कामाला लागले पाहिजे, जास्तीत जास्त जनतेपर्यंत तुम्ही पोहचवा व शिवसंग्राम संघटनेचे विचार व उद्देश साध्य करा. असे सांगुन नव्याने प्रवेशित महिलांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिवसंग्रामच्या गेवराई महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा साधनाताई दातखिळ यांनी केले तर सूत्रसंचालन महिला आघाडीच्या बीड शहर उपाध्यक्षा संगीताताई ठोसर यांनी केले तर आभार सुभद्राताई बेदरे यांनी मानले.