रामराज गोपालकृष्ण भट (वय 63), असे मृताचे तर त्यांच्या पत्नी संगीता (57) व मुलगा नंदन (30), असे मायलेकाचे नाव आहे. दोघांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. रामराज यांची एमआयडीसी भागात कंपनीत असून, अनेक दिवसांपासून ती बंद आहे. संगीता या गृहिणी, तर नंदन हा अभियंता आहे. तो शेअर ट्रेडिंग करतो. तीन वर्षांपासून रामराज यांना आर्थिक चणचण आहे. त्या तणावातून त्यांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. हॉटेलमध्ये जेवायला जाऊ, असे सांगून त्यांनी पत्नी व मुलाला बाहेर नेले. त्याच वेळी त्यांनी एका बाटलीत पेट्रोल आणि एका बाटलीत विष घेतले. पचनासाठी औषध घेऊन घेऊ, असे सांगत त्यांनी स्वत: विष घेतले. नंदन व संगीता यांनाही प्यायला सांगितले. संगीता यांनी ते पिले, तर नंदनने नकार दिला. काही कळायच्या आत रामराज यांनी बाटलीतील पेट्रोल स्वत:च्या आणि या दोघांच्या अंगावर टाकले. आग लावली. भडका उडाला. कारने पेट घेतला. संगीता व नंदन यांनी कसाबसा दरवाजा उघडला व ते बाहेर पडले. काही नागरिकांनी त्यांना मदत केली. तर, रामराज यांचा कारमध्ये जळून मृत्यू झाला.
आत्महत्येपूर्वी लिहिल्या दोन चिठ्ठ्या
रामराज यांनी आत्महत्येपूर्वी आर्थिक चणचणीतून कुटुंबासह आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहिली. स्वत:ला आग लावण्यापूर्वी त्यांनी ही चिठ्ठी कारमधून बाहेर फेकली. बेलतरोडी पोलिसांना ती आढळली. सविस्तर चिठ्ठी माझ्या घरातील कपाटात आहे, असे या चिठ्ठीत नमूद आहे. पोलिसांनी भट यांच्या घरातील आलमारीतूनही ही दुसरीही चिठ्ठी जप्त केली. यातही आर्थिक चणचणीतून आत्महत्या करीत असल्याचे इंग्रजीत लिहिले आहे.