१६६ कोटी रूपयांचा ठीगळांचा राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी मांजरसुंभा- चुंभळी; टोल सुरू करण्यापुर्वीच रस्ताकामाचे लोखंडी गज उघडे पडले आंदोलनाचा ईशारा देताच खड्डे बुजवले :- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
बीड जिल्ह्य़ातील राष्ट्रीय महामार्ग ५४८ -डी चुंबळी ते अहमदपुर राष्ट्रीय महामार्ग एकुण १७० किलोमीटर असुन अंदाजित किंमत ८७९ कोटी रूपये असुन कामाचा कालावधी पुर्ण होऊन सुद्धा २ वर्षापासून रखडलेले असुन चुंबळी ते मांजरसुंबा १६६ कोटी रूपयांचा ३३ किलोमीटरचा निकृष्ट रस्ता जागोजागी ठीगळांचा बनला असुन निकृष्ट कामामुळे रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले असुन राष्ट्रीय महामार्ग मृत्युमार्ग बनला असुन संबधित प्रकरणात वारंवार लेखी निवेदन तसेच आंदोलनानंतर सुद्धा प्रशासकीय आधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळेच संबधित प्रकरणात जबाबदार आधिका-यांवर कारवाई करण्यात यावी तसेच पुर्ण काम झाल्याशिवाय टोल आकारणी सुरू करण्यात येऊ नये असे लिखित निवेदन जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्य अभियंता म.रा.र.वि.म तसेच अधिक्षक अभियंता औरंगाबाद यांना दिले आहे.
राष्ट्रीय महामार्ग नव्हे मृत्युमार्ग ;२ वर्षात ४० पेक्षा जास्त बळी
काम पुर्ण झालेले नसुन निकृष्ट रस्तेकाम,चढ उतार तसेच दुभाजक तसेच गतिरोधक नसणे आदि गोष्टीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे मुळुकवाडी जवळील एकाचवेळी ३ शेतक-यांचा अपघाती मृत्यु, विकास सुंदर वैरागे,प्रकाश तुकाराम जाधव,आदित्य भावठाणकर,अजिंक्य धस,महेंद्र घुगे,काशीबाई थोरात ,चंद्रकला घुले,शेषेराव जाधव आदिसह ४० पेक्षा जास्त लोकांचा बळी गेलेला आहे. याविषयी वारंवार निवेदन देऊन सुद्धा आधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असुन संबधित प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात यावी.
टोल सुरू करण्यापुर्वीच गज उघडे तर जागोजागी भेगा पडलेल्या
चुंबळी ते मांजरसुंबा रस्ताकाम हुले कन्स्ट्रक्शन पाटोदा यांच्यामार्फत करण्यात येत असून टोल नाका आकारण्याच्या तयारीत असुन निकृष्ट रस्त्याप्रकरणात गुणनियंत्रक विभागामार्फत तपासणी तसेच काम पुर्ण झाल्याशिवाय टोल आकारण्यात येऊ नये अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा ईशारा सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर व भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष पाटोदा हमीदखान पठाण यांनी जिल्हापप्रशासनाला दिला आहे.
आंदोलनाचा ईशारा देताच खड्डे बुजले; :-डाॅ.गणेश ढवळे
_______
काल दि.१८ सोमवार रोजी लेखी तक्रार जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्य कार्यकारी अभियंता म.रा र.वि.(मर्या )औरंगाबाद यांना तक्रार देऊन रास्ता रोको आंदोलनाचा ईशारा दिल्यानंतर आज दि.१९ जुलै मंगळवार रोजी संबधित ठेकेदार आधिका-यांनी खड्डे बुजवून घेतले आहेत. परंतु पावसाळ्यात हे बुजवलेले खड्डे पुन्हा पडणार असुन पुन्हा लोखंडी गज उघडे पडतील.