प्रारंभ वृत्तसेवा
मुंबई : आता आधार कार्ड मतदान ओळखपत्राशी देखील लिंक होणार आहे. मतदारांची ओळख प्रस्थापित करून मतदार यादीतील नोंदींचे प्रमाणीकरण करणे आणि एकापेक्षा जास्त मतदार संघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदार संघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोंदणी ओळखली जावी, यासाठी मतदारांच्या मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड लुिंक केले जाणार आहे. 1 ऑगस्टपासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.