बीड शहरातील घटना; शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : शहरात राहणाऱ्या पोलीस निरीक्षकाच्या घरीच चोरी झाल्याची घटना 17 जुलै रोजी उघडकीस आली. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षकाच्या घरीच चोरी झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली होती.
पोलीस निरीक्षक महादेव राऊत हे सध्या नियंत्रण कक्षात कार्यरत आहेत. ते शहरातील गंगाधाम परिसरात राहत आहे. ते त्यांच्या सोलापुर जिल्ह्यातील मुळ गावी परिवारासह गेले होते. 17 जुलै ला ते बीड मध्ये आले असता. घरातील साहित्य उचकटल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्यांनी घरातील 10 ग्रॅमची सोन्याची अंगठी, चांदीचे दाने करंडे, चांदीचे ताट, रोख 70 हजार रुपये असा एकूण सव्वालाखाचा ऐवज लंपास केला. घराच्या मागील बाजूच्या खिडकीचे गज तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. चोरटे सीसीटिव्हीत कैद झाले आहेत. सुवर्णा महादेव राऊत यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.