देवेंद्रजी फडणवीस राज्याला पुढे घेऊन जाणारे नेतृत्व…आ.विनायक मेटे
बीड : शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष मा.आ.विनायकराव मेटे यांचा अभिष्टचिंतन सोहळा राजधानी मुंबईत उत्साहात संपन्न झाला.या सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील व विधान परिषद सदस्य,प्रवीणजी दरेकर हे आवर्जून उपस्थित होते . महाराष्ट्रातील मराठा तरुणांचा फक्त देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर विश्वास असून त्यांनी दिलेलं आरक्षण मुंबई उच्च न्यायालयामध्ये टिकून दाखवलं होते त्यामुळे मराठा समाजातील तरुणांच्या मराठा आरक्षणाबद्दलच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.ओबीसींचे गेलेले राजकीय आरक्षण मिळवून देण्याची क्षमता फक्त देवेंद्रजी फडणवीस यांच्यात आहे व ते ओबीसी समाजाला निश्चितपणे न्याय देतील यात तीळमात्र शंका नाही त्याचप्रमाणे मराठा समाजाला सुद्धा हे नवीन सरकार संवैधानिक न्यायालयात टिकल असे आरक्षण देईल त्यामुळे देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्र राज्याला पुढे घेऊन जाणारे नेतृत्व आहे अशा शब्दात विनायकराव मेटे यांनी गौरव केला.
मा.आ.विनायक मेटे पुढे बोलताना म्हणाले, आम्हाला न्याय द्या, अन्याय करा, काहीही करा, पण आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत .तुमच्या सोबत आहोत असा शब्द विनायक मेटे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.पुढे बोलताना आ.मेटे म्हणाले, देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारे नेतृत्व आहे. प्रत्येक विषयाची खोली, लांबी, रुंदी फडणवीसांना माहित आहे. भाजप सरकारच्या काळात फडणवीसांनी मराठा समाजाच्या विविध प्रश्नांना न्याय देण्याचे काम केले. मराठा समाजातील लाखो युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे काम फडणवीसांनी केले. मागच्या सरकारने मराठा समाजासह ओबीसी आरक्षण घालविले. मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचे नाव सुध्दा काढले नाही. कोरोनात सुध्दा भ्रष्टाचार करण्याचे काम मागच्या सरकारने केले. मात्र देवेंद्र फडणवीस राज्याला पुढे घेऊन जाणारे नेतृत्व असल्याचे माआ.मेटे यांनी सांगितले. राज्यातील सर्व गोरगरिब आणि विस्थापित समाज आज खुश झाला आहे आरक्षणाची लढाई ही विस्थापित लोकांची, गोरगरिबांची लढाई आहे. मराठा समाजाला न्याय देण्याची ताकद देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आम्हाला नितांत आदर आहे. ते देखील संघर्षातून पुढे आलेले आहेत असे सांगत आमच्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री आहेत असेही विनायकराव मेटे यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजीत अभिष्टचिंतन सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटिल, माजी विरोधीपक्ष नेते प्रविणजी दरेकर, आ. भारतीताई लव्हेकर, आ. भीमराव केराम, आ. बबनराव पाचपुते, आ. रत्नाकर गुट्टे, आ. अतुल सावे, शिवसंग्राम प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे,राजनजी धाग,(प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य),विक्रांत आंब्रे
(सरचिटणीस, महाराष्ट्रराज्य),व्यंकटेश मिश्रा (मुंबई, उपाध्यक्ष),संतोष कदम (मुंबई, उपाध्यक्ष)राम जगदाळे (खजिनदार, महाराष्ट्रराज्य),सुनील खाड्ये युवक अध्यक्ष मुंबई,.हिंदुराव जाधव (सचिव, महाराष्ट्र राज्य) प्रफुल्ल पवार (प्रवक्ता महाराष्ट्र राज्य) विवेक सावंत (मुंबई, कार्याध्यक्ष),अनुश्री माळगांवकर ,(मुंबई अध्यक्ष महिला आघाडी),दिपक कदम (अध्यक्ष, सांस्कृतिक विभाग),व्यंकटेश मिश्रा(मुंबई,उपाध्यक्ष),संतोष कदम (मुंबई उपाध्यक्ष),सुनील खाडे (युवकाध्यक्ष, मुंबई)शशिकांत शिर्सेकर (मुंबई, सरचिटणीस),सुरेंद्र खानविलकर (मुंबई, सरचिटणीस),बालाजी जाधव,(मुंबई, सचिव),ऐश्वर्या राणे(युवती, अध्यक्ष),पुंडलिक मालुसरे ,गणेश घोसाळकर(जिल्हाध्यक्ष),योगेश विचारे(जिल्हाध्यक्ष), विजय राणे (जिल्हाध्यक्ष),विलास भोईटे.(जिल्हाउपाध्यक्ष),आदी उपस्थित होते.आजच्या अभिष्टचिंतन सोहळ्यास राज्यभरातील शिवसंग्रामचे पदाधिकारी,कार्यकर्ते व हितचिंतक हजारोच्या संख्येने उपस्थित होते.