शिंदे- फडणवीस सरकारच्या लोककल्याणकारी निर्णयाचे भाजपा तर्फे जल्लोषात स्वागत..!
बीड प्रतिनिधी)
आज मा. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उप मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांनी नगराध्यक्ष व सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून निवड करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. राज्यात प्रस्थापित राजकीय लोकांचा स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपला पगडा निर्माण केला. वर्षानोवर्ष चेहरा बदलून एकाच कुटुंबाला नगरपरिषद सारख्या संस्थांवर स्वत: ची मक्तेदारी निर्माण केली. तर ग्रामीण भागातही ज्याच्याकडे पैसा व राजकीय पावर असलेल्या ठराविक लोकांच्याच ताब्यात ग्रामपंचायत जातात. आर्थिक दृष्ट्या कमकुवत चळवळीतील प्रामाणिक कार्यकर्ते, नेते यांना अशा निवडणुकीत परावाभाव पत्करावा लागतो. जनतेच्या मनाविरुद्ध नगराध्यक्ष व सरपंच निवडला जातो. राजकीय मक्तेदारी मोडीत काढून सामान्य जणांना न्याय देण्यासाठी थेट निवडीचा निर्णय ऐतिहासिक व लोकहिताचा आहे. असे विचार भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी व्यक्त केले.
आज मा. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उप मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांनी नगराध्यक्ष व सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून निवड करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.तसेच पेट्रोल व डीझेल चे दर कमी केले. आणीबाणीच्या काळातील आंदोलकांना पेन्शन चालू केली. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत थेट शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिला. अनेक लोक कल्याणकारी निर्णय राज्य सरकारने घेतल्याबद्दल भारतीय जनता पार्टी च्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा पदाधिकार्यांनी फटक्याची आतिषबाजी व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
याप्रसंगी सर्जेराव तांदळे, नवनाथ शिराळे, सलीम जहांगीर, प्रा.देविदास नागरगोजे, जगदीश गुरखुदे, चंद्रकांत फड, अजय सवाई, डॉ. लक्षमण जाधव, बालाजी पवार, शांतीनाथ डोरले, सुभाष धस, गणेश पुजारी, दीपक थोरात, अनिल चांदणे, कपिल सौदा, प्रमोद रामदासी, प्रा. सचिन उबाळे, अमोल तीपाले, विलास बामणे, भूषण पवार, बाबूलाल ढोरमारे, संभाजी सुर्वे, अमोल वडतिले, संध्या राजपूत, प्रीत कुकडेजा, उद्धव आरे, अम्मू शेख, नूर लाला, सरपंच वसंत गुंदेकर, दुष्यंत डोंगरे, सुरेश माने, पंकज धांडे, गणेश सांगुळे, बाळासाहेब गात, महेश सावंत, अजय ढाकणे, बद्रीनाथ जटाळ, शरद बडगे, गणेश माने, आदि सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.