कट्टर राजकीय विरोध असलेलं क्षीरसागर कुटुंब एका छताखाली आणण्याची किमया विधाते दांपणत्याने करून दाखवली
अष्टपुत्र प्रतिष्ठान आणि स्त्री शक्ती प्रतिष्ठानचा आषाढी महोत्सवाला भरभरुन प्रतिसाद
–350 महिला भजनी मंडळीना प्रोत्साहन पर साड्या भेट
–विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची प्रमुख उपस्थिती
-महिलांची लक्षणीय उपस्थिती
–पसायदान प्रकल्प, आणि मूकबधिर व अंध विद्यालय येथील विद्यार्थ्यांना संयुक्त भोजन
–संभाजीनगर मधील बालकांनी काढलेली बालदिंडी सर्व कार्यक्रमाचे आकर्षण ठरली
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : शहरातील विधाते दांपत्य गेल्या 11 वर्षापासून अष्टपुत्र प्रतिष्ठान आणि स्त्री शक्ती प्रतिष्ठानच्या वतिने आषाढी महोत्सवाचे आयोजन करत आहेत. या महोत्सवामुळे अनेकांना बीड मध्ये विठूरायाचे दर्शन घेण्याचे भाग्य मिळते. यावर्षी सुद्धा विधाते परिवारांने आषाढी महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवाला भरभरुन प्रतिसाद मिळाला असून यावेळी महिलांची लक्षणीय उपस्थिती पाहाव्यास मिळाली. 350 महिला भजनी मंडळींना यावेळी पोत्साहनपर साड्या भेट देण्यात आल्या. महोत्सवात विशेष म्हणजे कट्टर राजकीय विरोध असणारे क्षीरसागर कुटूंब एकाछताखाली आणण्याचे काम विधाते परिवारांने करुन दाखवले.
बीड शहरातील विलास विधाते व जयश्री विधाते हे दांपत्य गेल्या अनेक वर्षापासून विविध सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातुन गरजुंना मदतीचा हात देत आहे. त्यांच्या या मदतीमुळे आज पर्यंत अनेकांना मोठी मदत मिळाली आहे. यासह धार्मिक कार्यात सुद्धा विधाते दांपत्य पुढे असते. गेल्या 11 वर्षापासून आषाढीला आषाढी महोत्सवाचे आयोजन बीड शहरात केले जाते. यावर्षी सुद्धा हा महोत्सव मोठ्या आनंदाच्या वातावरणात पार पडला. यावेळी बीड शहरासह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी दर्शन घेण्यासह फराळीस आणि द्वादशीच्या महापंगतीस उपस्थिती दर्शवली, विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीसह कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय जाणवली, सर्व कार्यक्रमास पुरुषा पेक्षा महिलांची उपस्थिती लक्षणीय होती, पडत्या पावसात भाविकांचा उत्साह मंत्रमुक्त करणारा होता, डॉ. दिपाताई क्षीरसागर यांच्या मधुर आवाजाने आणि भरत आण्णा लोळगे यांच्या पहाडी आवाजाने भाविकांचे लक्ष वेधून घेतले, आनंद नगर, अंकुश नगर, कॅनरा बँक कॉलनी, संत नामदेव नगर, संभाजी नगर, भाग्य नगर, सहयोग नगर येथील भजनी मंडळातील महिलांनी वेगवेगळ्या वेशभूषा साकारून कृतीयुक्त केलेले भजन लक्ष वेधून घेत होते. यासह विशेष म्हणजे राजकीय विरोधक असणारे क्षीरसागर कुटूंब मात्र यावेळी एकाच छताखाली आले होते. डॉ. योगेश क्षीरसागर, सारीका योगेश क्षीरसागर, नेहा संदीप क्षीरसागर, प्रिया हेमंत क्षीरसागर आणि श्रुती अर्जुन क्षीरसागर, पुष्पा पांगारकर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी विशेष उपस्थिती अनिल जगताप, सी ए जाधव, बळीराम गवते, विलास बडगे ,अरुन डाके, विनोद मुळुक, भीमराव वाघचौरे, राजू पिंगळे, दिलीप गोरे, ऍड महादेव तुपे, कैलास वाघ, यांच्यासह बीड जिल्ह्यातील सुवर्णकार संघटना, व्यापारी, डॉक्टर्स व सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थिती होती.