बीड शहरउपाध्यक्षापदी संगीताताई ठोसर, केज तालुकाध्यक्षापदी तेजश्रीताई खामकर,सोनीजवळा ता गणप्रमुखपदी स्वातीताई कुपकर व विडा गटप्रमुखपदी अंजलीताई पटाईत यांच्या निवडी जाहीर
महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अँड.मनीषाताई कुपकर यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन
बीड :.विनायकरावजी मेटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री राजनजी घाग यांच्या सूचनेवरून, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायणदादा काशीद यांच्या सहमतीने तसेच जिल्हा सरचिटणीस अनिल भाऊ घुमरे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा उपाध्यक्ष किसन दादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार, दिनांक 6 जुलै रोजी शिवसंग्राम भवन, नगर रोड, बीड येथे शिवसंग्राम महिला आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
या कार्यक्रमांमध्ये सर्वप्रथम व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माँसाहेब जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.शिवसंग्राम महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अँड. मनीषाताई कुपकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसंग्राम परिवाराच्या वतीने अभिष्टचिंतन करण्यात आले.यावेळी महिला आघाडीच्या नविन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करून त्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अँड. मनीषाताई कुपकर यांनी. पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करत जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे व जिल्हा उपाध्यक्ष किसन दादा कदम व जिल्हाध्यक्षा अँड. मनीषाताई कुपकर यांच्या हस्ते नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.यामध्ये महिला आघाडीच्या बीड शहरउपाध्यक्षापदी संगीताताई ठोसर,महिला आघाडीच्या केज तालुकाध्यक्षापदी तेजश्रीताई खामकर,महिला आघाडीच्या सोनीजवळा ता.केज गणप्रमुखपदी स्वातीताई कुपकर ,महिला आघाडीच्या विडा ता.केज गटप्रमुखपदी अंजलीताई पटाईत यांना मान्यवरांच्या व महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समक्ष नियुक्तीपत्र प्प्रदान करण्यात आली.
जिल्हाध्यक्षा अँड.मनीषाताई कुपकर यांचा 6 जून रोजी वाढदिवसनिमित्ताने बैठकीसाठी उपस्थित असलेल्या महिला व मान्यवरांनी पुष्पहार घालून त्यांचा यथोचित सत्कारासह अभिष्टचिंतन केले.व्यासपीठावर उपस्थित असलेल्या महिला आघाडीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी यावेळी त्यांचा आदर सन्मान केला.जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे व जिल्हा उपाध्यक्ष किसन दादा कदम यांनी मनोगत व्यक्त करताना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या,व येत्या काळात महिला आघाडीची उत्तरोत्तर प्रगती व्हावी,आदरणीय मेटे साहेबांच्या सामाजिक कार्यातून प्रेरणा मिळावी यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सत्काराला उत्तर देतांना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अँड. मनीषाताई कुपकर यांनी माँ जिजाऊंची प्रतिमापूजन करून बैठकीची सुरुवात करण्याचा उद्देश व हेतू उपस्थितांसमोर मांडला.राणी तारामती,अहिल्यादेवी होळकर,झाशीची राणी लक्ष्मीबाई,सावित्रीबाई फुले,माता रमाई या सर्व आदर्श व्यक्तिमत्त्वांची ओळख करून देताना.महिलांनी स्वतःला कमी न समजता आदरणीय मेटे साहेबांचे विचार घराघरात पोहोचवण्याचे काम करावे,अशीअशा व्यक्त करत शिवसंग्रामच्या सामाजिक कार्यात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवावा.अशी विनंती केली.उपस्थित मान्यवरांनी व महिलांनी वाढदिवसनिमित्ताने दिलेल्या शुभेच्छांचा नम्रतापूर्वक स्वीकार करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शिवसंग्राम चे जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की,आगामी नगरपालिका व पंचायत समिती , जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसंग्राम आज युद्ध पातळीवर काम करताना दिसून येत आहे . शिवसंग्रामच्या विविध आघाडीच्या पुनर्बांधण्या केल्या जात असून नूतन पदाधिकारी यांना नियुक्ती दिली जात आहे . आगामी निवडणुकांमध्ये खऱ्या अर्थाने शिवसंग्रामला गुलाल लागणे हेच एकमेव ध्येय मनात धरून प्रत्येक कार्यकर्ता आज काम करत आहे . याचाच एक भाग म्हणून शिवसंग्राम महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ मनीषाताई कुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्ती देऊन सन्मानपत्र देण्यात आले . ग्रामीण व शहरी भागातील महिलांना खऱ्या अर्थाने आपल्या न्याय व हक्कासाठी लढण्याचं शिवसंग्राम बळ देत आहे .ग्रामीण व शहरी भागामध्ये महिलां – भगिनीमध्ये शिवसंग्रामबाबत आत्मीयता वाढत आहे असे दिसून येत आहे.
याप्रसंगी लिंबागणेश सर्कल प्रमुख बाळासाहेब जाधव,प्रभाग प्रमुख हरिश्चंद्र ठोसर,शिवसंग्राम नेते धनंजय भोसले,मुकुंद गोरे,रेखाताई तांबे,शारदाताई बेदरे,शिवकन्या ताई गिराम,मंगलताई आरसुळ,जयश्रीताई देशपांडे,निर्मलाताई किंबहुने,सुनंदाताई ठोसर,वर्षाताई बेदरे,रेश्माताई शिंदे,सुवर्णाताई दरेकर,,आयोध्या ताई कुपकर, अर्चनाताई कुपकर,नम्रता कुपकर व अन्य पदाधिकारी महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसंग्रामचे युवा नेते मुकुंद गोरे यांनी केले.