बीडच्या पालकमंञी पदी लवकरच वर्णी!
प्रारंभ न्युज
बीड: मंञी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील आघाडी सरकार पडल्यानंतर लवकरच राज्यात सत्तापरिवर्तन होणार असून उद्या भाजपा व शिंदे गट सत्तेत येणार आहे. मुख्यमंञी म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंञी म्हणून एकनाथ शिंदे उद्या शपथ घेणार आहेत. याच मंञीमंडाळात शिवसंग्रामचे विनायकराव मेटे यांची वर्णी लागणार असून त्यांना बीडचे पालकमंञी होण्याचा मान सुद्धा मिळणार असल्याची माहिती खाञीलायक सुञांकडून मिळत आहे.
संघर्षातून उमललेले नेतृत्व म्हणून आ.विनायक मेटे यांच्याकडे पाहिले जाते. कोणताच राजकिय वारसा नसताना सुद्धा आ.विनायक मेटे हे गेल्या २५ वर्षापासून आमदार आहेत. यादरम्यान त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले आहे. त्यांना लवकर लाॅटरी लागणार असून प्रथमच आ.मेटे हे कॅबिनेट मंञी होणार आहेत. यासह त्यांच्याकडे बीडचे पालकमंञी पद सुद्धा देण्यात येणार असल्याची माहिती सुञांकडून मिळत आहे. असे जर झाले तर आ.विनायक मेटे यांच्यासाठी हे मोठे यश असेल