महाराजांच्या स्वागतासाठी उपस्थित रहा: युवा उद्योजक बळीराम गवते
बीड/प्रतिनिधी: राज्यात सत्तापालटाचे वारे वाहत असताना छत्रपती संभाजीराजे हे बीड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दि.२७ जून रोजी सकाळी धाकटी पंढरी श्री.क्षेत्र नगद नारायण गड येथे येणार आहेत. छत्रपती संभाजी राजेंच्या स्वागतासाठी परिसरातील छत्रपतीपे्रमींनी उपस्थित रहावे, असे अवाहन नारायणगडचे विश्वस्त बळीराम गवते यांनी केले आहे.
छत्रपती संभाजी राजे हे विविध विषयांवर शेतकरी, कष्टकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान, या दौऱ्याची सुरूवात धाकटी पंढरी श्री.क्षेत्र नगद नारायण गड येथे संत महतांच्या समाधीचे दर्शन घेवून करण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता छत्रपती संभाजी राजे हे गडावर येणार आहेत. त्याठिकाणी छत्रपती संभाजी महाराज, गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे.छत्रपती संभाजी राजे प्रथमच नगद नारायण गड येथे येत असल्याने त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. नारायणगड पंचक्रोशीतील तरूण यावेळी उपस्थित राहणार आहेत. राज्यात सत्तेची उलथापालथ होत असताना संभाजी राजे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद साधणार आहेत. शेतकरी, कष्टकरी यांना कोणी वाली उरला नसून त्यांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने हा दौरा असणार आहे. नगद नारायणगड येथे सर्व छत्रपतीप्रेमींनी सकाळी वेळेत उपस्थित रहावे, असे अवाहन गडाचे विश्वस्त बळीराम गवते यांनी केले आहे.