आषाढीनिमित्त जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नयेसाठी बस विभाग सज्ज
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : गेल्या दोन वर्षापासून कोव्हीडचे वातावरण होते, यामुळे आषाढी वारी होऊ शकली नव्हती. परंतु यावर्षी कोरोनाची परस्थिती आटोक्यात आल्यामुळे आषाढीवारी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. याच अनुषंगाने बीड बस विभागाच्या वतिने दखल घेत, पंढरपुरला जाण्यासाठी 180 जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यातून पंढरपुरला जाण्यासाठी विशेष बसचे नियोजन करण्यात आले आहे. यात बीड बस विभागातील 8 आगारातुन ह्या बसेस धावणार आहेत. या आठ आगारातुन एकूण 180 बसेस असणार आहेत. गेल्या दोन वर्षापासून आषाढी वारी झाली नव्हती, परंतू यावर्षी कोरोना आटोक्यात आल्यामुळे आषाढी वारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. याचीच दखल घेऊन बीड बस विभागाकडून विशेष बसची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बीड बस विभागाकडून करण्यात आले आहे.
आगार बस संख्या
बीड 30
परळी 25
धारुर 20
माजलगाव 20
गेवराई 20
पाटोदा 20
आष्टी 20
अंबाजोगाई 20
एकूण 180