सुरत मध्ये एकनाथ शिंदेबरोबर २५ आमदार; आघाडीला धक्का!
आघाडी सरकर अस्थिर करण्यात यश; आघाडी सरकार पडणार?
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : शिवसेनेचे अनेक आमदार संपर्कात नसून यातील शिवसेनेचे मंञी एकनाथ शिंदे यांच्यासह २५ आमदार त्याच्या सोबत गुजरात मधील सुरत याठिकाणी असण्याची चर्चा आहे. एवढे आमदार संपर्कात नसल्यामुळे राज्यात मोठा भुकंप होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापनदिनीच शिवसेनेला मोठी खिंडार पडली आहे. याच अनूषंगाने मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांनी तातडीने बैठक बोलावली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत २५ आमदार असल्याची माहिती सुञांकडून मिळत आहे. एकनाथ शिंदे व त्याच्यासोबत असणारे नेते भाजपा सोबत गेले तर आघाडी सरकार पडु शकते. दुपारी १२ वाजता एकनाथ शिंदे पञकार परिषद घेणार असून या पञकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुरतच का निवडले!
मंञी एकनाथ शिंदे व त्याच्या सोबत असणार्या आमदाराने अचानक सुरत ला जाण्याचा निर्णय का घेतला? एवढे आमदार अचानक संपर्कात नसणे? सुरत मधील हाॅटेलच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त, काल झालेल्या निवडणूकीत फुटलेले मतदान यासह इतर बाबींमुळे मोठे नियोजन झाल्याचे समजते.