उद्या शिट्टी वाजवा आंदोलन:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
बीड : जिल्ह्य़ातील खाजगी तसेच विशेषत: इंग्लिश स्कूल संस्था चालकांकडुन डोनेशन,शुल्कवाढ या बरोबरच शाळेचा गणवेश,खेळाचा गणवेश,पुस्तके,बुट,साॅक्स,दफ्तर आदि शालेय साहित्य शाळेतच अथवा ठराविक दुकानातूनच खरेदी करण्याची सक्ती करण्यात येत असून शिक्षण विभागाचे संस्थाचालकावर नियंत्रण नसल्यामुळेच पालकांची आर्थिक लुट होत असुन होणारी लुट शिक्षण विभागाला दिसत नाही का??त्यांना मोतीबिंदु झालाय का??असा प्रश्न पडला असुन या विरोधात सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली उद्या दि.२० जुन सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “शिट्टी वाजवा आंदोलन “करण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद,शिक्षणाधिकारी
( प्राथमिक )जिल्हापरिषद बीड यांना दिले आहे.
सामाजिक न्याय मंत्र्यांच्या जिल्ह्यात मागासवर्गीय विद्यार्थांवर अन्याय अडीच कोटींचा निधी अखर्चित शिक्षणाधिकारी,कंत्राटदारांवर कारवाई करा:-डाॅ.गणेश ढवळे
____
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड धनंजय मुंढे यांच्या बीड जिल्ह्य़ातच मागासवर्गीय विद्यार्थांवर अन्याय होत असून मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०१९-२० आणि २०२०-२१ अंतर्गत संगणक व दुर्गमा भागातील मुलींसाठी सायकल खरेदी साठी एकुण अडीच लाख रूपयांचा आलेला निधी शिक्षणाधिकारी ( प्राथमिक )जिल्हापरिषद बीड श्रीकांत कुलकर्णी व कंत्राटदार यांच्या अनागोंदी कारभार व नियोजनाअभावी अखर्चित झाला असून संबधित प्रकरणात जबाबदार आधिका-यांवर व कंत्राटदारांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.