बीड (प्रतिनिधी) चांगले काम करताना अनेकदा टीकेचे धनी व्हावे लागते. प्रशिक्षण शिबिरात कार्यकर्त्यांना आपल्या कामाची व्याप्ती व त्यासंबंधीच्या कायदा नियमावली बाबत सखोल माहिती मिळत असल्याने काम करण्याचे धाडस वाढते. पोलिसांना चांगले काम करत असतांना अनेक वेळा कार्यकर्त्यांना टिकेचे धनी व्हावे लागते. हीच परिस्थिती कार्यकर्त्यांची देखील असते. असे असले तरी कामाबाबत प्रामाणीकपणा व ईच्छाशक्ती महत्वपुर्ण असल्याचे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सुनिल लांजेवार यांनी केले.
जन आंदोलनाच्या कार्यकर्त्यांसाठी आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात अप्पर पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार, विठाईचे सर्वेसर्वा डॉ. श्रीहरी लहाणे, अँड. अजित देशमुख व जिल्हाध्यक्ष गोवर्धन म्हस्के, एकनाथ जायभाये आदिंच्या उपस्थितीत दिप प्रज्वलन करून उद्घाटन झाले.
लांजेवार पुढे म्हणाले की, कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून कार्यकर्ता घडत असतो. समाजात परिवर्तन घडवून आणायचे असेल तर शिकलेला कार्यकर्ता समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी समाजाभिमुख राहायला हवे. कार्यकर्त्यांनी समाजाचे प्रश्न जाणून घेतले पाहिजेत, असेही ते म्हणाले.
जन आंदोलनाच्या मराठवाड्यातील कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अजित देशमुख हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मराठवाड्यातील जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांसह शेकड्यावर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते
– – – –