शिवसंग्रामच्या बीड जिल्हाध्यक्षपदी नारापण काशीद यांची निवड
पदावरुन कार्यमुक्त करण्याची दोन महिन्यापुर्वीच केली होती मागणी — सुधिर काकडे
प्रारंभ न्युज
बीड : बीड पंचायत समितीचे माजी सभापती नारायण काशीद यांची शिवसंग्रामच्या जिल्हाध्यक्षपदी आज (ता. २२) आमदार विनायक मेटे यांनी निवड केली. गेल्या काही महिन्यापासून सर्वच कार्यक्रमापासून अलिप्त असणारे शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष सुधिर काकडे यांनी हे पद नको म्हणून दोन महिन्यापुर्वी आमदार विनायक मेटे यांना सांगितले होते. यामूळे आज हे पद काशीद यांना देण्यात आले आहे.
शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष सुधिर काकडे गेल्या काही दिवसापासून राजकारणात सक्रीय नव्हते. एक जिल्हाध्यक्ष म्हणून असणारी कामे त्याच्याकाळात विशेष काही झाली नाही. यामुळे गेल्या काही वर्षात त्याचे काम निराशाजनक दिसले. गेल्या दोन महिन्यापुर्वीच मला हे पद नको म्हणून मी साहेबांना सांगितले असल्याचे सुधिर काकडे यांनी प्रारंभशी बोलताना सांगितले. येणार्या निवडणूकांच्या अनुषंगाने आज नव्या जिल्हाध्यक्षाची निवड करण्यात आली आहे. नारायण काशीद यांना राजकारणातील चांगला अनुभव असून ते या पदावर चांगले काम करतील अशी चर्चा आहे.
मी शिवसंग्राम मध्ये: सुधिर काकडे
माझ्या इतर कारणामुळे गेल्या दोन महिन्यापुर्वीच हे पद नको म्हणून मी आमदार विनायक मेटे साहेबांना सांगितले होते. पदावर नसलो तरी पक्षात मी आहे. माझे मिञ तथा नविन जिल्हाध्यक्ष नारायण काशीद यांना माझ्याकडून शुभेच्छा. (माजी जिल्हाध्यक्ष सुधिर काकडे)