–आरोप होऊन 20 दिवस झाले तरीही आमदाराचे साधे पत्रक सुद्दा नाही
–एवढे आरोप होऊन सुद्धा आमदार शांतच असल्यामुळे नागरीक संभ्रमात
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : बीड मतदार संघाचे आमदार संदिप क्षीरसागर यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे अमर नाईकवाडे, फारुख पटेल, गंगाधर घुमरे यांनी काही दिवसापासून शिवसेनेत जाहिर प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यात अमर नाईकवाडे यांनी मात्र आमदार संदिप क्षीरसागर यांच्यावर आरोपांचा पाऊसच पाडला होता. यात विशेष म्हणजे आमदार संदिप क्षीरसागर यांच्यावर एवढे आरोप होऊन 20 दिवस झाले तरी सुद्धा त्यांनी आज पर्यंत हे आरोप खरे की खोटे या संदर्भात साधे पत्रक सुद्धा काढलेले नाही. आमदार संदिप क्षीरसागर यांच्यावर झालेल्या आरोपानंतर व आमदार शांत असल्यामुळे मात्र येथील नागरीक चिंचेत पडल्याचे दिसत आहे.
अमर नाईकवाडे, फारुख पटेल, गंगाधर घुमरे या तिघांनी संदिप क्षीरसागर यांना आमदार करण्यासाठी जिवाचे रान केले होते. परंतु संदिप क्षीरसागर हे आमदार झाल्यानंतर ही तिघेही आमदार संदिप क्षीरसागरांपासून दुरावले होते. शहरात प्रवेशाचा मोठा कार्यक्रम घेऊन या तिघांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वात शिवसेनेत जाहिर प्रवेश केला होता. परंतु या प्रवेशाच्या वेळी अमर नाईकवाडे यांचे भाषण मात्र चर्चेचे ठरले होते. यावेळी अमर नाईकवाडे यांनी आमदार संदिप क्षीरसागर यांच्यावर मात्र मोठ्या प्रमाणात आरोप केलेे होते. एखाद्या आमदारावर एवढे आरोप होऊन सुद्धा ते आमदार शांत असल्याची घटना कदाचित पहिलेच असेल. आमदार संदिप क्षीरसागर शांत असल्यामुळे मात्र हे केलेले आरोप खरेच आहेत की काय? किंवा आमदार यांनी साधे पत्रक सुद्धा काढले नाही याच्या मागचे कारण काय? यासह इतर प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. तर दुसरीकडे आमदार संदिप क्षीरसागर यांनी आरोपाला काहीच उत्तर न दिल्यामुळे येथील नागरीक मात्र चिंचेत पडले आहेत.
भैय्यासाहेब आमदारकीसाठी नगर पालिका महत्वाचीच…!
बीड मतदार संघात एखाद्याला जर विजय मिळवायचा असेल तर त्या उमेदवारासाठी बीड नगर पालिकेची सत्ता असणे खुप महत्वाचे आहे. 2019 मध्ये आमदार संदिप क्षीरसागर यांना शहरातुनच जास्त लिड मिळाली होती. यामुळेच त्यांचा विजय झाला होता. सध्या बीड नगर पालिकेची मुदत संपल्यामुळे कधीही येथील निवडणूका लागल्याची शक्यता आहे. यामुळे आमदार संदिप क्षीरसागर यांनी बीड नगर पालिकेसाठी विशेष जोर लावण्याची गरज आहे. परंतु सध्या बीड शहरात आमदार संदिप क्षीरसागर यांचे विशेष लक्ष दिसत नाही. भैय्यासाहेब भविष्यात जर परत आमदारकी आपल्याकडेच राहावी अशी इच्छा असेल तर बीड नगर पालिकेसाठी विशेष जोर लावाच…