आमदार विनायक मेटे यांनी अधिवेशनात मांडली होती लक्षवेधी
-डाॅ. उत्कर्ष गुट्टे, निता अंधारे यांची चौकशी करुन निलंबन तर राहूल टाळके, सुधीर जाधव, सलिम सय्यद याकूब, योगेश हांडे यांचे अखेर निलंबन
प्रारंभ वृत्तेसवा
बीड : बीड नगर पालिकेतील अनागोंदी कारभारामुळे बीडकरांना विविध समस्यांचा सामना करावा लागला होता. अनेक वेळा या संदर्भात आवाज उठवून सुद्धा बीड नगर पालिकेच्या कामकाजात सुधारणा होत नव्हती. यामुळे आमदार विनायक मेटे यांनी बीड नगर पालिकेत सुरु असलेल्या अनागोंदी कारभार अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातुन समोर आणला होता. याची दखल घेऊन आज नगर पालिकेचे सीओ डाॅ उत्कर्ष गुट्टे, नगर प्रशासन अधिकारी निता अंधारे यांची चौकशी करुन निलंबन होनार आहे तर राहुळ टाळके पाणी पुरवठा अधिकारी, सुधीर जाधव कर अधिक्षक, सलिम सय्यद याकूब कनिष्ठ रचना सहाय्यक, योगेश हांडे बांधकाम अधिकारी यांच्या निलबंनाची घोषणा अधिवेशनात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली.
बीड नगरपालिका हद्दतील नागरिकांना पिण्याचे पाणी 15-15 दिवसांनी मिळणे, माजलगाव बॅकवॉटर व बिंधुसरा धरणांमधून बीड शहरा करीता येणारे गढूळ, आणि पिण्यायोग्य नसणे फिल्टर प्लांटची अत्यंत वाईट अवस्था झालेली असणे बिलीचिंग पावडर पूर्ण विरघळत नसणे, शुध्दीकरण व्यवस्थीत न केल्यामुळे नागरीकांच्या आरोग्याशी नगरपालिकेने प्रयत्न करणे, त्या बाबत कोणतीही काळजी न घेणे याचबरोबर बीड नगरपालिका हद्दीमध्ये अनेक वसाहती मध्ये वीज नसणे वेळेवर वीज न मिळणे बेकायदेशीर अनेक ठिकाणी कनेक्शन निदर्शनास येणे , रस्त्यावरच्या वीज महिनो महिने बंद असणे त्यामुळे मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे प्रमाण व अवैध धंद्याचे, गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले असणे, याबाबत नगरपालिकेने व महावितरण कंपनीने पूर्ण दुर्लक्ष करणे बीड नगरपालिकेने कोरोना काळातील मयताच्या अंत्यविधी मध्ये मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार करणे, मयतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार करणे, त्यामध्ये अधिकारी- पदाधिकारी सामील असणे नगररचना कार व ट्रेसर्स यांनी अवैध बांधकामास भ्रष्टाचार करून मोठ्या प्रमाणात अभय देणे पैसे घेतल्या शिवाय कोणतीही बांधकाम परवान्याचे काम न करणे यासह इतर महत्वांचे प्रश्न आमदार विनायक मेटे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातुन अधिवेशनात मांडले होते. याचीच दखल घेऊन आज बीड नगर पालिकेतील सहा अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. आमदार विनायक मेटे यांच्यामुळे आता बीडकरांना योग्य त्या सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.