मुंबई/प्रतिनिधी
यावर्षी उन्हाळ्यामध्ये गावागावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये पिण्याच्या पाण्याची योजना तात्काळ मंजूर करावी अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे
आज मंत्रालयात राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर करावी, ज्या गावातून योजनेचे प्रस्ताव आले आहेत ते मंजूर करून सरपंचाला विश्वासात घेऊन गावोगाव ही योजना राबवणे महत्त्वाचे आहे तशा सूचना संबंधितांना द्याव्यात गावात या योजना राबवत असताना सरपंचांना टाळले जात असल्याचे निदर्शनास येत आहे त्यामुळे ही योजना राबवत असताना गावच्या सरपंचाला विश्वासात घेऊनच ही योजना राबवली तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल,काही लोक यात राजकारण करत असून त्यावर अंकुश ठेवणे महत्वाचे आहे,
पुढील तीन ते चार महिने उन्हाळ्याचे असल्यामुळे गावातील महिलांना पाण्यासाठी दूरवर जावे लागते त्यामुळे या योजना तात्काळ सुरू होणे गरजेचे असून बीड जिल्ह्यात अनेक गावांमध्ये अजूनही अशा योजना सुरू झालेल्या नाहीत यापूर्वी देखील असे प्रस्ताव दाखल करण्याचे आपण आवाहन केले असून आलेले प्रस्ताव तात्काळ मंजूर करावेत अशी आग्रहाची मागणी माजीमंत्री क्षीरसागर यांनी केली आहे