जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत विशेष बैठक घेण्यासाठी गृहमंत्र्यांना पत्र
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे, जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, चोऱ्या, खुन, मारामाऱ्या, महिलांवरील अत्याचार, खंडणी वसुली, तलवारी, रिव्हॉल्हवर अशा घातक शस्त्राचा सर्रास वापर होऊ लागला आहे. जिल्ह्यात पोलीस यंत्रणा आहे की नाही? असा सवाल उपस्थित करत, बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर विशेष बैठक घेण्याची मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केली आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून याकडे मात्र संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे जिल्ह्यातील अवैद्यधंद्यांनी डोके वर काढले आहे. जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर आता सर्वच स्थरातुन आवाज उठवला जात आहे. भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी सोमवारी (ता. 28) जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर नाराजगी दाखवत, जिल्ह्यातील परिस्थिती सुधारण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मागणी केली आहे.