तहसीलदार सचिन खाडे व वाळू माफियांमध्ये नवा वाद; एकमेकांवर गुन्हे नोंद
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : गेवराई तालुक्यात वाळूचा परिसर जास्त असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात अवैद्य वाळूचा उपसा होते. शासनाचा कोटी रुपयांचा महसूल बुडतो. याला येथील अधिकारी जबाबदार असतात. त्याचे कारण सुद्धा तसेच आहे. येथील अधिकाऱ्यांनी ठरवले तर येथील दगड सुद्धा हलणार नाही. गेल्या अनेक वर्षापासून गेवराई तालुक्यात वाळू माफियांनी व काही अधिकाऱ्यांनी लाजा सोडल्याचे प्रकार अनेक प्रकारावरुन दिसले आहेत. सध्या गेवराई तालुक्याचे तहसीलदार व काही वाळू माफियांमध्ये धुसफूस सुरु असल्याचा प्रकार सुरु आहे. तहसीलदार सचिन खाडे यांना काही वाळू माफियांनी धमकी दिल्याची तक्रार स्वत:तहसीलदार सचिन खाडे यांनी दिली आहे. सध्या गेवराई तालुक्यात सुरु असलेले अनेक प्रकार गैर असून हे सर्व प्रकार रोखण्यासाठी गेवराईला एक खमक्या तहसीदार देण्याची मागणी होत आहे.
गेवराई तालुक्यात चांगले अधिकारी देण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून मागणी होत होती. परंतु आज पर्यंत या मागणीची दखल घेण्यात आलेली नाही. आता तरी याची दखल सत्ताधारी नेत्यांनी घ्यावी. पंधरादिवसापुर्वीच गेवराई तालुक्यात वाळू माफियांनी खोदलेल्या मोठ्या खड्डयात चार चिमुकल्यांचा जिव गेला आहे. एवढे होऊन सुद्धा जे खरे आरोपी आहेत त्यांच्यावर मात्र अजून सुद्धा कारवाई करण्यात आलेली नाही. सध्या तर याठिकाणी असणारे तहसीलदार यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे व तहसीलदार यांच्या तक्रारीवरुन काही वाळू माफियांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यामुळे येथील सर्व प्रकार पुन्हा सर्वांसमोर आला आहे. गेवराई तालुक्यातील हे सर्व प्रकार बंद करण्यासाठी आता याठिकाणी एक खमक्या तहसीलदार देण्याची मागणी होत आहे.