जनता दुधखुळी समजू नका:कामे कुणी मंजूर करून घेतली ते सांगा-डोईफोडे, मिसाळ
बीड/प्रतिनिधी
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विद्यमान पालकमंत्री आणि स्थानिक आमदार आता वेगळी खेळण्याच्या नादात रमू लागले आहेत चार वर्षापूर्वी मंजूर झालेले काम आपणच मंजूर करून आणले असा कांगावा करत उद्या नारळ फोडणार आहेत,बीडच्या आमदाराला पालकमंत्री साथ देत त्यांच्या चमकोगिरीत सहभागी झाले आहेत,ही कामे कधी आणि कुणी मंजूर करून आणली याची पोलखोल करत आहोत जनतेने अशा भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन जि प सदस्य गणपत डोईफोडे व माजी सभापती सुधाकर मिसाळ यांनी केले आहे
माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आमदार आणि मंत्री असताना जिल्हारुग्णालयाच्या अतिरिक्त खाटा मंजूर करून घेतल्या,तसेच मतदार संघातील विविध रस्त्यांचे प्रस्ताव देखील दाखल करून मंजूर करून घेतले मात्र निवडणुका लागल्या आणि पुढे सत्तेवर आलेल्या आ संदीप क्षीरसागर यांनी पालकमंत्री मुंडे यांना हाताशी धरून कामे थांवण्यास भाग पाडले, करण आगामी काळात नगर पालिका निवडणुका आहेत,जनतेला काही तरी केल्याचे दाखवावे लागेल नसता जनता घरी बसवणार यामुळे ठिकठिकाणी नारळाचा सडा टाकला जात आहे,वास्तविक जिल्हा रुग्णालय बीड येथे सध्या 300 खाटा कार्यान्वित असून त्यामध्ये अतिरिक्त 200 खाटा वाढून 500 खाटा सुरू करण्यास दिनांक 28 ऑगस्ट 2014 च्या शासन निर्णयान्वये मान्यता दिली होती. सदर 200 खाटांच्या बांधकामाचे अंदाजपत्रक उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग बीड यांनी तयार केले होते. कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग बीड, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ उस्मानाबाद , मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग औरंगाबाद आणि उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ लातूर यांनी हे अंदाजपत्रक साक्षांकित केल्यानंतर सदरहु अंदाजपत्रकास 2017-18 च्या दरसूची नुसार मान्यता मिळणे बाबत आरोग्यसेवा संचालनालय यांनी प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता.
बीड रुग्णालयाच्या 200 वाढिव खाटांना प्रशासकीय मान्यता मिळणे बाबत 6 फेब्रुवारी 2019 नगर परिषद बीड च्या विविध कामांचा लोकार्पण सोहळा आणि शुभारंभ या कामांसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस बीड येथे आले असता माजी मंत्री जयदत्तआण्णा क्षीरसागर यांनी विनंती केली होती . त्या अनुषंगाने 21 ऑगस्ट 2019 रोजी बीड येथील वाढीव 200 खाटांच्या बांधकामाच्या अांदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती.
त्याचबरोबर दिनांक 10 जानेवारी 2020 ला औरंगाबाद येथे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे यांना बीड येथील 200 खाटांच्या रुग्णालय सोबत रायमोह येथील 30 खाटाच्या रुग्णालयाच्या मिळालेल्या प्रशासकीय मान्यता आणि कोणत्याही आरोग्य सुविधा रद्द करू नयेत त्याला अनुषंगाने निधीची तरतूद करु निविदा काढाव्यात अशी विनंती केली होती. त्यानुसार माननीय मुख्यमंत्री यांनी या बाबींची दखल घेऊन निविदा आणि निधी या दोन्ही गोष्टीला मान्यता दिली आणि आमदार महोदय म्हणत आहेत कामाला मंजुरी आम्ही मिळवली. वरील सर्व तारखा सांगतात की दूध का दूध पानी का पानी.त्याच बरोबर साक्षाळपिंप्री-पारगाव सिरस-खापरपांगरी-बीड-एमआयडीसी-कुर्ला रस्ता कि.मी.15/500 ते 27/500 व 29/00 ते 31/800 या लांबीत सुधारणा करणे ता.बीड (प्रजिमा 28 रस्ता) 3 कोटी, या रस्त्याची 2018 -19 ला निवीदा काढण्यात आलेली असुन ओढून ताणून 100 कोटीचा आकडा जनतेसमोर मांडण्याचा हा खटाटोप लावला आहे.तसेच रायमोहा आणि शिरूर(वारणी) ग्रामीण रुग्णालयाच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन सहा महिने झाले आहेत याबाबत माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी नुकतेच मंत्री अशोक चव्हाण आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या भेटी घेऊन निविदा का थांबवण्यात आल्या याची चौकशी करून ही कामे तात्काळ सुरू करावीत अशी मागणी केली आहे,ही कामे स्वतःच्या मर्जीतील गुत्तेदारांना मिळावीत आणि मलिदा लाटता यावा यासाठी निविदा थबवण्यात आल्याचे समजते,आज होणारे उद्घाटन केवळ मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या 70 कोटीच्या कामाचा कार्यारंभ आदेश निघाला म्हणून 100 कोटी पर्यंत यांना जायचे होते पण जनतेला या सगळ्या बाबी माहीत आहेत.ये पब्लिक है जो सब जानती है इथून पुढे तरी आमदाराने स्वकर्तृत्वावर निधी आणून जनतेचे विकास कामे करावेत त्यांचे स्वागत आहे.मात्र जनतेला भूलथापा मारून नगर पालिका डोळ्यासमोर ठेऊन आपणच कसे कामे करून आणू शकतो हे दाखवू नका बीडची जनता दूधखुळी नाही आणि जनतेनेही सत्य काय ते तपासूनच विश्वास ठेवावा असे आवाहन जि प सदस्य गणपत डोईफोडे, माजी सभापती सुधाकर मिसाळ यांनी केले आहे